तरुण भारत

‘हे’ तीन पत्रकार आहेत मागील दोन महिन्यांपासून गायब

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनच्या वुहान शहरातून होणारा कोरोनाचा वाढता फैलाव उघड करणारे तीन पत्रकार मागील दोन महिन्यांपासून गायब आहेत.

Advertisements

चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ अशी या तिन्ही पत्रकारांची नावे आहेत. 
चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा फैलाव जगभरात होत असल्याची माहिती या पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड केली होती. तिघांनीही यूट्युब आणि ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करून याबाबतची माहिती समोर आणली होती. त्यानंतरच हे तिन्ही पत्रकार रहस्यमयरित्या गायब झाले आहेत.

चेन क्यूशी हे 34 वर्षीय पत्रकार 6 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजल्यापासून गायब आहेत. फेंग बिंग हे 9 फेब्रुवारीला सोशल मीडियावर काही व्हिडीओ टाकल्यापासून गायब आहेत. तर ली जहुआ हे 25 वर्षीय पत्रकार 26 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. ते एका वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. 

Related Stories

कोरोनाचा कहर : दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांनी गमावला जीव; सर्वात जास्त मृत्यू बिहारमध्ये

Rohan_P

जगभरात बाधितांच्या संख्येने ओलांडला 7 कोटींचा आकडा

datta jadhav

‘राणी’ घेतेय हरवलेल्या मालमत्तेचे भाडे

Patil_p

देशातील 2 हजार 221 रुग्ण कोरोनामुक्त

prashant_c

भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Abhijeet Shinde

बसवाहक योगनाथन यांना सलाम

Patil_p
error: Content is protected !!