तरुण भारत

तेलंगणा : सफाई कर्मचाऱ्याकडून दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

ऑनलाईन टीम / तेलंगणा :

कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांचा आकड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. यासोबत त्यांनी पीएम केअर फंड आणि सीएम केअर फंडमध्ये मदतीचं आवाहन केले आहे. मोदींनी हाक देताच अनेक उद्योजक, सेलिब्रिटींनी मदतीचा हात दिला आहे. त्यातच आता तेलंगणा मध्ये कौतुक करण्यासारखी गोष्ट एका सफाई कर्मचाऱ्याने केली आहे. 

Advertisements


तेलंगणा मधील एका सफाई कर्मचाऱ्याने आपला दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे.

दरम्यान, तेलंगणाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांनी ट्विटर वरून या कर्मचाऱ्याने अभिनंदन आणि कौतुक केले आहे. 

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, माझ्या राज्यात माझे सामान्य नागरिकच खरे हिरो आहेत. आज उत्तनुर मधील या सफाई कर्मचाऱ्याने आपला दोन महिन्याचा पगार म्हणजेच सतरा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. बोंथा साई कुमार असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. असे म्हणत त्यांनी बोंथा याचे कौतुक केले आहे. तसेच हा तरुण अधिकाऱ्याकडे धनादेश देत असल्याचा फोटो देखील ट्विट केला आहे.

 बोंथा यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

Related Stories

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

भारतात 5 व्या दिवशी 20 राज्यातील 1.12 लाख लोकांना लसीकरण

pradnya p

कोल्हापूर : सावे येथे तीन वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक

triratna

अयोध्या : राम मंदिर उभारणीसाठी देणगी देणाऱ्यांना आयकरात सूट

datta jadhav

लोणंद-आदर्की फाटा रस्त्याच्या कामास मंजुरी : खा. उदयनराजे

datta jadhav

तीन दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

Patil_p
error: Content is protected !!