तरुण भारत

2019-20 मध्ये सोने आयात घटली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

मागील आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये देशातील सोने आयात 14.23 टक्क्मयांनी घटून 28.2 अब्ज डॉलरवर राहिली आहे. 2018-19 मध्ये 32.91 अब्ज डॉलरचे सोने आयात झाले आहे. सोने आयात घटल्याने देशातील व्यापार तोटा कमी करण्यास मदत मिळणार आहे. 2019-20 मधील व्यापारातील तोटा 152.88 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, 2018-19 मध्ये तो 184 अब्ज डॉलर होता.

सोने आयातीमध्ये डिसेंबरमध्ये घसरण सुरु झाली होती. भारत जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी लक्षात घेता देशात सोने आयात जादा होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशात वर्षाला 800 ते 900 टन सोने आयात होते. व्यापारी तूट आणि चालू खात्यातील तूटीवर सोने आयातीवर नकारात्मक परिणाम पहावयास मिळत आहे.

Related Stories

फ्लिपकार्ट आयपीओ आणणार?

Patil_p

कोरोनाचा विळखा : ओयोकडून कर्मचारी कपातीचे संकेत

tarunbharat

चीनकडून अँट समूहावर निर्बंधाचे संकेत

Patil_p

कृषिपरिवर्तनाची नांदी

Omkar B

बायोकॉनचा डीकेएसएचसोबत करार

Patil_p

व्हर्च्युअल व्हीजिटींग कार्डची सुविधा आता गुगलवर उपलब्ध

Patil_p
error: Content is protected !!