तरुण भारत

राजविद्या केंद्रातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

प्रतिनिधी / फोंडा

देशभर शांततेसाठी प्रसार करणाऱया राजविद्या केंद्राच्या सुकूर पर्वरी विभागातर्फे लॉकडाऊनच्या काळात गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. विविध जीवनावश्यक वस्तुंच्या साधारण 400 पोत्या पर्वरी पोलीसस्थानकात सुपूर्द करण्यात आल्या. पर्वरी पोलीसांतर्फे हे सामान गजूंना वितरीत करण्यात येणार आहे.

पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक निनाद देऊलकर यांच्याकडे हे सामान सुपूर्द करण्यात आले. तांदूळ, डाळ, पीठ, हळद, मीठ, तेल व साबण या वस्तूंचा त्यात समावेश आहे. यावेळी राजविद्या केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते. राजविद्या केंद्रातर्फे यापूर्वीही आपत्तग्रस्त काळात गरीबांना मदत पुरविण्यात आली आहे.

Related Stories

धारबांदोडय़ात खुलेआम पत्त्यांचा जुगार तेजीत

Patil_p

गावी जाण्यासाठी कामगारांचा पेडणेत रास्ता रोको

Patil_p

ओल्ड गोव्याचा ग्रेटर पणजीमध्ये समावेश रद्द

Patil_p

गोव्यातील बेकारीचा दर वाढला

Amit Kulkarni

‘रूपशा नोदीर बांके’ सैनिकावर आधारित चित्रपट

Amit Kulkarni

विरोधी पक्षनेते कामत यांच्याकडून केपेतील उमेदवार नाईक यांची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!