तरुण भारत

लॉकडाऊनमध्ये कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटात

ऑनलाईन टीम / बेंगळूर : 

देशात लॉकडाऊनचे आदेश असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्न आज थाटामाटात पार पडले. या लग्नसोहळ्याला अनेकांची उपस्थिती होती. 

Advertisements

रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर कुमारस्वामींचा मुलगा निखिल याचा व्हीव्हीआयपी लग्न सोहळा पार पडला. काँग्रेेेसचे वरीष्ठ नेेते एम कृष्णाप्पा यांच्या मुलीसोबत निखिलचे लग्न झाले. 10 फेब्रुवारीला या दोघांचाही साखरपुडा झाला होता.

 लग्नाविषयी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, लग्नासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीतच रामनगरमधील फार्म हाऊसमध्ये हे लग्न करण्यात आले. निखिलचे लग्न हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

 कर्नाटक सरकार या लग्नाचे चित्रीकरण करणार असून, जर कोणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. 

Related Stories

वाढीव घरपट्टी रद्द करण्यासंदर्भात नगरविकास खात्याला पत्र

Patil_p

खडा पहारासाठी समर्थनगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

Omkar B

व्हॅक्सिन डेपोची स्थगिती कायम

Amit Kulkarni

पश्चिम महाराष्ट्रातील 27 उद्योग पुन्हा सुरू

prashant_c

उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांची संख्या 1912 वर

Rohan_P

कर्नाटक: येडियुरप्पा यांच्या जागी कोण?; “पक्षश्रेष्ठी आज संध्याकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करणार”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!