तरुण भारत

टीसीएसच्या तिमाही नफ्यात काहीशी घसरण

वर्षभरात उत्पन्नात 7.1 टक्क्मयांनी वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisements

देशातील सॉफ्टवेअर क्षेत्रात सेवा देणारी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) कंपनीचा मार्च तिमाहीचा नफा काहीसा घसरला आहे. मार्च 2020 च्या तिमाहीत निव्वळ नफा 8,089 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी समान तिमाहीत हा नफा 8,126 कोटी रुपयावर राहिला होता. अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. याच दरम्यान कंपनीच्या उत्पन्नात 5.1 टक्क्मयांनी वाढ होऊन 39,946 कोटी रुपयाच्या घरात पोहोचल्याचे सांगितले आहे. हेच उत्पन्न मागील वर्षातील याच कालावधीत 38,010 कोटी रुपयावर राहिले होते.

संपूर्ण वर्षभरात 2019-20 या कालावधी कंपनीला निक्वळ नफा कमाई 2.7 टक्क्मयांनी वधारुन 32,340 कोटी रुपयावर पोहोचली आहे. तर वर्षभरातील एकूण उत्पन्नात मात्र 7.1 टक्क्मयांनी वाढ होत, 1,56,949 कोटी रुपयाच्या घरात पोहोचली आहे.

घसरण पण काहीसा दिलासा

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार गोपीनाथ यांनी म्हटल्याप्रमाणे मार्च तिमाहीच्या आगेदर निम्मी कामगिरी काहीशी तेजीत झाल्यामुळे कोरोना संकटाचा इतका मोठा परिणाम कंपनीच्या कामगिरी झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दुसऱया बाजूला मागील तिमाही कंपनीचे काहीसे चांगले व्यवहार झाले होते.

Related Stories

तेजसला भारती एअरटेलकडून कंत्राट

Patil_p

1 एप्रिलपासून एसी, टीव्ही, वाहने -स्मार्टफोन महागणार

Patil_p

चिनी ऍप प्रतिबंध : देशी ऍप चिंगारीला वाढली पसंती

Patil_p

विदेशी गुंतवणूकदारांची भारताला पसंती

Patil_p

देशातील निर्यात 36.47 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

हुरून ग्लोबल 500 च्या यादीत 12 भारतीय कंपन्या

Patil_p
error: Content is protected !!