तरुण भारत

वाहन-आरोग्य विम्यांचे हप्ते मुदत वाढविली

15 मेपर्यंत विमाधारकांना दिलासा : लॉकडाऊनमुळे निर्णय, तिसऱया पार्टीसाठी विमा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisements

लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा दुसऱया टप्प्यात येत्या 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या अगोदर वाहन आणि आरोग्य विम्यांचे हप्ते भरण्याच्या कालावधीत सवलत देण्यात आली होती. पुन्हा हा कालावधी वाढवून सरकारने वाहनांचे तिसऱया पार्टीचा इन्शुरन्स आणि आरोग्य इन्शुरन्स विम्यांचे हप्ते जमा करण्यासाठीचा कालावधी येत्या 15 मेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती दिली आहे. सध्या 25 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत जमा करावा लागणारा हप्ता येत्या 14 एप्रिलनंतर भरता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

या अगोदर सरकारकडून 21 एप्रिलपर्यंत सदर विम्यांचे हप्ते जमा करण्यास सवलत मिळाली होती. परंतु सरकारने हा कालावधी पुन्हा वाढवून विमाधारकांना दिलासा दिला आहे.

तिसऱया पार्टीसाठी विमा आवश्यक 

आरोग्य विम्याच्या बाबतीत विमाधारकांनी आपला रिन्युअल हप्ता भरण्यास एक महिन्याचा कालावधी असतो. परंतु या काळात हप्त्यांचा भरणा केल्यास पॉलिसीला रिन्युअल करण्यात येऊ शकते असेही म्हटले आहे. परंतु तिसऱया पार्टीचा वाहन विम्यासाठी ग्राहक यावेळी रिन्युअल करु शकत नसून यात कोणताही जादा कालावधी मिळत नसतो. परंतु यामध्ये कोणत्याही व्यक्तीने विमा तिसऱया पार्टीचा वाहन विमा नसतानाही वाहन चालविल्यास त्यास जवळपास 2 हजाराचा दंड आकारला जाण्याची शक्मयता आहे. हा नियम मोटार वाहन अधिनियम 1988नुसार 146च्या नुसार, रस्त्यांवर वाहन चालवताना तिसऱया पार्टीचा विमा असणे बंदनकारक आहे.

Related Stories

RIL AGM 2021 : ‘जिओ फोन नेक्स्ट’ गणेश चतुर्थीला येणार : मुकेश अंबानी

Rohan_P

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच

datta jadhav

मजबूत बाजारमूल्यासोबत टीसीएस दुसऱया स्थानी

Patil_p

बीएमडब्ल्यूच्या कार्स महागणार

Patil_p

ऑगस्टमध्ये निर्यात 45 टक्क्यांनी वधारली

Patil_p

मसाला विक्रीमध्ये झाली घसरण

Patil_p
error: Content is protected !!