तरुण भारत

लवकरच मोबाईल, टीक्ही कपडय़ांची ऑनलाईन विक्री

20 पासून मुभा : इलेक्ट्रॉनिक साहित्यांसह अन्य गोष्टींचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वेगाला बळकटी देण्यासाठी ज्या ठिकाणी आवश्यक आहे. त्या ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता आणून त्यांच्या जोरावर अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न आगामी काळात करण्यासाठी विविध उपाययोजना सरकार आखण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 20 एप्रिलपासून ई कॉमर्स कंपन्यांना लॉकडाऊनच्या दुसऱया टप्प्यात ही सवलत देण्यात येणार आहे.

प्रथम यात सर्व साहित्यांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार नाही, परंतु आगामी काळात टीव्ही, मोबाईल, तयार कपडय़ांची विक्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. येत्या 20 एप्रिलपासून
ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि
स्नॅपडील सारख्या ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून वरिल साहित्यांची खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध
होणार आहे.

अधिसूचना सादर

देशात लॉकडाऊनचा कालावधी येत्या 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे गृह सचिव अजय भल्ला यांनी संशोधनात्मक पद्धतीने एक मार्गदर्शक सूचना सादर केल्या आहेत. यात टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप या सारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्यासोबत अन्य उत्पादनांची खरेदी 20 एप्रिलपासून ऑनलाईन स्वरुपात करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण गृह विभागाकडून देण्यात आले आहे.

Related Stories

हय़ुंडाईच्या नव्या कारची घोषणा- ‘अल्काझार’ लवकरच भेटीला

Amit Kulkarni

‘एलजी’कडून नवा प्रोजेक्टर लाँच

Omkar B

इंडिया फर्स्टमधील हिस्सेदारी युनियन बँक कमी करणार

Patil_p

जेएसडब्ल्यू स्टीलचे उत्पादन 5 टक्क्यांनी वाढले

Patil_p

जूनमध्ये 4.27 कोटी ई-वे बिलाचे सादरीकरण

Patil_p

कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी घसरण

tarunbharat
error: Content is protected !!