तरुण भारत

तिकिटांची रक्कम परतीचे विमान कंपन्यांना आदेश

नागरी उड्डाण मंत्रालयाकडून पत्र सादर : प्रवाशांना पैसे देण्यात टाळाटाळ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisements

लॉकडाऊनच्या पहिल्या सुचनेच्या दरम्यान आगामी तीन मेपर्यंत ज्या प्रवाशांनी तिकिटे बुकिंग केली आहेत. त्या प्रवाशांची रक्कम परत करण्याचे आदेश सरकारकडून विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. तीन आठवडय़ांपर्यंत तिकिटाचे पैसे परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाकडून या संदर्भातील अधिसूचना सादर केली आहे. 

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत विमान सेवा देणाऱया कंपन्यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱया टप्प्यासाठा (25 मार्च ते 3 मे) या कालावधीच्या प्रवासासाठीची तिकिटे बुकिंग करण्यात आली होती. परंतु देशातील लॉकडाऊनचा कालावधी पंतप्रधानांनी वाढविल्याने तिकिटांची रक्कम परत करणाऱया विमान कंपन्यांना लवकरात लवकर ती प्रवाशांना देण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.

आयआरसीटीसीचा वादा फोल?

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या कालावधीत तिकिटांची बुकिंग रद्द करण्यात आल्यानंतरही तिकिटाची रक्कम परत केली नाही. तसेच परतावा देताना त्यामधील शुल्का कपात करण्याच्या नियमानुसार मोठय़ा प्रमाणात रक्कम कपात केल्याने प्रवाशी नाराज झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दुसऱया टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यामुळे 15 ते 3 मे या कालावधीत जवळपास 39 लाख तिकिटे रद्द करावी लागली आहेत. सरासरी आयआरसीटीसीने तिकिट रद्द करण्यासाठी नॉन एसी वर्गासाठी 15 रुपायाचे तिकिट रद्दचे 15 रुपये शुल्क व प्रथम वर्गाची तिकिटे रद्द करण्यासाठी 30 रुपयाचे शुल्क आकारण्यात आले आहेत. इतके करुनही त्यांनी पेमेंट गेटवे शुल्कही वसूल केला असल्याची माहिती आहे.

Related Stories

‘ओला’ची ई-स्कूटर 15 ऑगस्टपर्यंत होणार सादर

Patil_p

आर्थिक मंदीनंतर आता वाहन उद्योगावर कोरोनाचे संकट

tarunbharat

चीनपासून घ्यावयाचे आर्थिक धडे

Omkar B

हिरो इलेक्ट्रिकची ऑनलाईन बुकिंग सुविधा

Patil_p

‘फ्यूचर’च्या अडचणींमध्ये वाढ, सेबीकडून निर्बंध

Amit Kulkarni

एचडीएफसी बँकेचे कर्ज स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!