तरुण भारत

आरबीआयच्या निर्णयाने बँकिंग-आर्थिक क्षेत्र तेजीत

कोरोनाच्या लढय़ात आरबीआयचा दिलासा : सेन्सेक्स वधारला

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

मागील काही दिवसांपासून जगभरातील कोरोनाचा वाढता टक्का वाढत असून त्यांची धास्ती जगभरातील शेअर बाजारांनी घेतल्याचे पहावयास मिळाले आहे. याच कालावधीत देशातील शेअर बाजार काहीसे दबावात राहिले होते, यात काही प्रमाणात घसरणीचे सत्र कायम राहिले होते. परंतु सध्या देशातील शेअर बाजार चालू आठवडय़ात दोन दिवस तेजीत राहिला आहे. यात अंतिम दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेन्स तेजीत राहिला आहे. याचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने रिर्व्हस रेपोदर 0.25 टक्क्मयांनी कपात करण्याची घोषणा केल्यानंतर आर्थिक, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्राचे समभाग तेजीत राहिले आहेत. 

दिवसभराच्या कामगिरीनंतर अंतिम क्षणी सेन्सेक्स 986.11 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,588.72 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 273.95 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,266.75 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये
ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 13 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, टीसीएस, कोटक महिंदा बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभागही तेजीत राहिले आहेत. मात्र नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंदा आणि सन फार्मा यांचे समभाग घसरले आहेत.

आरबीआयने व्याजदर कपात केल्याच्यानंतर संवेदनशील घटकांसाठी मोठा दिलासा मिळणार असल्याच्या संकेतामुळे प्रामुख्याने बँकिंग, आर्थिक, वाहन आणि रियल्टी या क्षेत्रांत 6.83 टक्क्मयांची तेजी पहावयास मिळाली आहे. आरबीआयच्या घोषणेनंतर रुपया 48 पैशानी वधारुन 76.39 प्रति डॉलरवर राहिला आहे. व्याजदर कपातीच्या निर्णयामुळे जागतिक बाजारांसोबत देशातील बाजाराला मजबूती  मिळणार असल्याचे कोटक सिक्मयुरिटीचे उपाध्यक्ष संजीव जरवाडे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रवाभ कमी न झाल्यास अर्थव्यवस्थेवरील दबावाचे सावट राहणार आहे.

Related Stories

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना नवीन आयएफसी कोड घ्यावा लागणार

Patil_p

15 वर्षे टिकणाऱया बॅटरीची निर्मिती

Patil_p

खेळणी कारखाने उभारण्यासाठी 92 प्रस्ताव

Patil_p

बिर्ला फॅशनकडून ‘सब्यसाची’त हिस्सेदारी

Amit Kulkarni

दुबई एक्स्पो वर्ल्ड प्रदर्शन 2020 लांबणीवर

Patil_p

…तर 2.8 लाख कोटींचा फटका बसणार?

Patil_p
error: Content is protected !!