तरुण भारत

रेठरेधरणच्या ‘त्या’रुग्णाच्या रिपोर्ट बाबत संशय?

इस्लामपूर/प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील कोरोना बाधित रुग्णाच्या रिपोर्ट बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असूनही यंत्रणा बिनकामाची पळाली. गावाला कुटुंब, गाव व इतर व्याधींवर उपचार करणाऱ्या डॉक्टर यांना त्रास झाल्याची चर्चा आहे.त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रिपोर्ट मिळवल्याची चर्चा आहे.

Advertisements

हा रुग्ण दि.२० मार्च रोजी गावी आला. त्याला लिव्हरचा त्रास होता. त्यामुळे दि.३ एप्रिल रोजी तो इस्लामपुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. दि.५ रोजी त्याला घरी सोडण्यात आले. पुन्हा त्रास होवू लागल्याने त्याला दि.९ रोजी रुग्णवाहिकेतून मुंबई येथे हलवण्यात आले. दि.१२रोजी अपोलो हॉस्पिटल मधून थेट इस्लामपुरातील खाजगी डॉक्टरांना रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. रेठरेधरण लॉकडावून करण्यात आले. गावात सर्वे करण्यात आला. पण सध्या त्या रुग्णाच्या नातेवाईकांना रिपोर्ट प्राप्त झाला असून त्या तारखेचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे पुढे आल्याचे समजते.

Related Stories

सोमवारपासून 3 हजार शाळा सुरू

Abhijeet Shinde

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेर फरार घोषित

Patil_p

प्रशासनाला अंधारात ठेवत बगाड यात्रा

Patil_p

नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केली भाजी मंडईची पाहणी

Patil_p

शहर पोलिसांकडून तडीपार गुंडास अटक

Patil_p

रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात

Patil_p
error: Content is protected !!