तरुण भारत

ब्रिटनचे माजी फुटबॉलपटू हंटर कोरोनाचे बळी

लंडन/ वृत्तसंस्था

ब्रिटनचे माजी फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचा गुरूवारी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे शुक्रवारी लिड्स फुटबॉल क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. ते 76 वर्षांचे होते. नॉर्मन हंटर हे इंग्लडच्या फुटबॉल संघाच्या बचावफळीत खेळत असत. तसेच इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिडस् फुटबॉल क्लबचे ते प्रतिनिधीत्व करीत होते.

Advertisements

 गेल्या आठवडय़ात नॉर्मन हंटर यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यावर त्याना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये त्याना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तब्बल एक आठवडय़ापेक्षा अधिक कालावधीत हंटर यानी कोरोनाशी कडवी लढत दिली पण त्यांचा गुरूवारी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आपल्या 15 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीत त्यानी लिडस् क्लबकडून 726 सामन्यात खेळ केला असून 1966 साली फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया ब्रिटनच्या संघात त्यांचा समावेश होता.  ब्रिटीश फुटबॉल फेडरेशन तसेच लिड्स क्लबतर्फे त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Stories

आयपीएलमध्ये आता खेळणार 10 संघ ; बीसीसीआयचा निर्णय

Rohan_P

देशभरात ऑनलाईन क्लासेसची चलती : माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन

Patil_p

एनबीए स्टार कोबी ब्रायंटचे अपघाती निधन

Patil_p

यू-19 विश्वचषकासाठी धनयंजयाकडे लंकेचे नेतृत्व

Patil_p

इंग्लंडचा जेसॉन रॉय टी-20 मालिकेतून बाहेर

Patil_p

आशियाई चषक स्पर्धा आयोजनासाठी कतारचा अर्ज

Patil_p
error: Content is protected !!