तरुण भारत

सोन्याळ येथे कोरोनाविषयी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण

वार्ताहर / सोन्याळ

जत तालुक्यातील सोन्याळ येथे संरपच, उपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका,मदतनीस, आशा वर्कर्स, इतर कर्मचाऱ्यांना कोविड १९ विषाणू संदर्भात ऑनलाइन प्रशिक्षण (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) देण्यात आले. सांगली जिल्हा परिषद येथून या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सरपंच सौ संगीता निवर्गी, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सोन्याळ येथील श्री विजय विठ्ठल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रशिक्षणासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

Advertisements

या प्रशिक्षण कार्यक्रमात कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना काय ? क्वारंटाइन आणि आयसोलेशन याच्यात काय फरक आहे ? गरम पाण्यात विषाणू मरतो का ? कोणत्या रूग्णांना या आजाराचा जास्त धोका संभवतो? आदी विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ निवर्गी,उपसरपंच सुमन कांबळे, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार, जक्कु निवर्गी, तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार, विजयकुमार बगली, काडसिद्द काराजनगी, दयानंद मुचंडी, अभिजित कांबळे, आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक व केंद्रचालक हे उपस्थित होते.प्रशिक्षण पार पाडण्यासाठी हायस्कूलचे जकप्पा बिरादार, रामणणा मुचंडी, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक ऐवळे, डाटा ऑपरेटर कविता सनोळे, अमृत सनोळे, बिराप्पा पुजारी,भीमणणा पुजारी यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३१.१९ टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Shinde

सांगली : कत्तलखाना, कचरा डेपामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांवर अटक वॉरंटची शक्यता

Abhijeet Shinde

लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब ?; उद्या घोषणा होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

सातारा : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणची दिव्यांगांच्याप्रती अनास्था

Abhijeet Shinde

इचलकरंजीत समूह संसर्ग? 8 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!