22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मर्यादित उद्योग सोमवारपासून सुरू

ऑनलाईन टीम / मुंबई : 

देशातील टाळेबंदी 3 मे पर्यंत वाढविण्यात आली असली तरीही नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. 20 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.   

देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावे. मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार आहे.
 

शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचं कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापुरात मंगळवारच्या 39 पॉझिटिव्हने रुग्णसंख्या 83 वरून 122 वर

Shankar_P

…त्यांना सेल्यूलर जेलमध्ये ठेवा : संजय राऊत

prashant_c

आणि लाखाचा ऐवज परत मिळताच ‘त्या’ महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Shankar_P

खुशखबर : महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी

pradnya p

जिल्हय़ात सोमवारपासून दस्त नोंदणी सुरू : जिल्हाधिकारी

triratna

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Shankar_P
error: Content is protected !!