तरुण भारत

धबधबेवाडी येथे वुद्धाची आत्महत्या

पन्हाळा/ प्रतिनिधी

धबधबेवाडी ता.पन्हाळा येथील शिवाजी आनंदा खोपकर वय ५४  वर्ष यांनी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळावरुन मिळेलेली अधिक माहिती अशी की, शिवाजी खोपकर आज  सकाळी ६ वाजता घरातुन बाहेर पडून रानातून जाऊन येतो म्हणून सांगून गेले होते. मात्र गावातील काळवाट नावाच्या शेतातील आंब्याच्या  झाडाला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केली. पण सकाळी लवकर कोणी रानात जात नसल्याने कोणाच्या निदर्शनात आले नाही. पण ज्या वेळी आसपासचे गावातील ग्रामस्थ शेतामध्ये काम करायला जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिस ठाण्याला कळविली. तथापि शिवाजी खोपकरांना गेल्या काही वर्षापासुन विविध आजारांनी ग्रासले होते.त्यात घराची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी आपल्या आजारपणाला कंटाळुनच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत हरिबा रामचंद्र खोपकर वय-42 यांनी फिर्याद दिली असुन अधिक तपास पोलिस निरीक्षक ए.बी.फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काँन्सटेबल कुंभार करत आहेत.शिवाजी खोपकर यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात आज १ बळी तर ८७ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

शिवजयंती साधेपणाने आणि उत्साहात साजरी करा : उपमुख्यमंत्री

Rohan_P

अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत चालकावर गुन्हा

Patil_p

शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल!

Rohan_P

सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली : सुधीर मुनगंटीवार

Rohan_P

साखर कारखानदार टेन्शनमध्ये…!

Sumit Tambekar
error: Content is protected !!