तरुण भारत

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच

शनिवारी 25 नव्या रुग्णांची भर : एकाचा मृत्यू : संसर्गबाधितांचा आकडा 384

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

राज्यात मागील तीन दिवसांमध्ये आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी छातीत धडकी भरवणारी आहे. गुरुवारी 36, शुक्रवारी 44 आणि शनिवारी 25 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तीन दिवसांत राज्यात 105 रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील रुग्णसंख्या 384 इतकी झाली आहे. शनिवारी बागलकोट आणि म्हैसूरमध्ये प्रत्येकी 7, बेंगळूरमध्ये 3, गुलबर्गा व विजापूरमध्ये प्रत्येकी 2, बेळगाव, धारवाड, मंडय़ा, गदग जिल्हय़ात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर बेंगळूरमध्ये 42 वर्षीय कोरोनाबाधिताचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

आरोग्य खात्याने शनिवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये 12 नवे रुग्ण आढळल्याचे नमूद होते. तर सायंकाळपर्यंत त्यात आणखी 13 रुग्णांची भर पडली आहे. तर 16 जण संसर्गमुक्त झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील एकाचा समावेश आहे. बेंगळूरमध्ये सीलडाऊन करण्यात आलेल्या पादरायनपूर वॉर्डातील तिघेजण शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वॉर्डात आतापर्यंत 17 जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे या जिलहय़ातील रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. म्हैसूरमध्येही 7 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामधील 6 जण नंजनगूडच्या ज्यूबिलियंट फार्मा कंपनीशी संबंधित आहेत.

गुलबर्ग्यात डॉक्टरला संसर्ग

गुलबर्गा येथे 2 वर्षीय बालकावर उपचार केलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. वाडी येथे वास्तव्यास असलेल्या मूळच्या उत्तरप्रदेशमधील दांपत्याने पाय मोडल्याने बालकाला 11 एप्रिल रोजी गुलबर्गा जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. उपचाराच्या दुसऱया दिवशीच बालकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुण्s त्याला पुन्हा इस्पितळात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून दिल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. मात्र त्याच्या पालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण बालकावर उपचार केलेल्या 23 वर्षीय महिला डॉक्टरला संसर्ग झाला आहे.

आणखी एकाचा मृत्यू : बळींची संख्या 14

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत असतानाच शनिवारी बेंगळूरमध्ये 42 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. बेंगळूरमध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूरमध्ये 4, गुलबर्ग्यात 3, चिक्कबळ्ळापूरमध्ये 2 तसेच बागलकोट, बेळगाव, गदग, तुमकूर आणि विजापूमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

अफगाणिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चाधिकार गट

Patil_p

लसीचा एकही डोस वाया घालवू नका !

Amit Kulkarni

कोलकाता : रेल्वे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 9 जणांचा मृत्यू

Rohan_P

मोदी नसते तर भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगना राणावत

triratna

पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द : गृहमंत्री

Rohan_P

काँग्रेस उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!