तरुण भारत

हब्बनहट्टी गावाजवळ रस्त्यावर सापडली पाचशे रुपयाची नोट

ग्रामस्थांत कोरोना व्हायरसची धास्ती,  नोट परीक्षणासाठी पोलिसांनी घेतली ताब्यात

खानापूर /वार्ताहर

Advertisements

जांबोटीजवळील हबनहट्टी ते स्वयंभू हनुमान मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर एक पाचशे रुपयांची नोट सापडल्याने ग्रामस्थांत एकच खळबळ उडाली आहे. गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध सदर पाचशे रुपयांची नोट पडलेली बैलूर येथील रस्त्यावरून येणाऱया दुचाकीस्वारांना दिसली. सदर बाब गावात कळताच काहींनी गर्दी केली. मात्र त्या नोटेला कोणीही हात लावला नाही. तातडीने जांबोटी आऊट पोस्टमधील पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश सिंगी यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर नोट त्यांनी काळजीपूर्वक एका प्लास्टिक पिशवीमध्ये घालून ती खानापूरला तपासणीसाठी पाठविली आहे.

 एकीकडे कोरोना व्हायरसच्या संसर्गासाठी रस्त्यावर नोटा टाकून त्याअंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची धास्ती समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या अथवा इकडे-तिकडे विखुरलेल्या नोटा कोणीही सहजपणे हातात धरू नये, असे व्हॉट्सऍपद्वारे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पडलेल्या नोटा घेताना गांभीर्य राखण्यासाठी नागरिकही सतर्क झाले आहेत. हब्बनहट्टी रस्त्यावर पडलेली सदर पाचशे रुपयांची नोट नेमकी कोणाच्या खिशातून पडली असावी का, की कोणी जाणीवपूर्वक समाजात भीती निर्माण करण्यासाठी टाकली असावी, अथवा कोरोना व्हायरससंदर्भातच या नोटेचा संबंध असावा, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.

Related Stories

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीला 16 लाखांचा नफा

Patil_p

खानापुरात 112 क्रमांकाबाबत माहिती फलकांद्वारे जागृती

Patil_p

येळ्ळूरमधील एकाला कोरोनाची लागण

Patil_p

हेस्कॉमचा उद्योजकांना वीजबिलाचा शॉक

Patil_p

वाचनालय बचाव समितीची याचिका न्यायालयाने फेटाळली

Patil_p

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आज बेळगावात

Patil_p
error: Content is protected !!