तरुण भारत

हिरेबागेवाडीतील तरुणाला कोरोनाची लागण

प्रतिनिधी/ बेळगाव

हिरेबागेवाडी येथे कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. शनिवारी सकाळी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये हिरेबागेवाडी येथील 45 वषीय तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील बाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे.

Advertisements

3 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या बेळगाव जिल्हय़ातील पहिल्या यादीतील रुग्ण क्र. 188 च्या संपर्कातून या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. सकाळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये राज्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा उल्लेख होता. सायंकाळच्या अहवालात मात्र ही संख्या 25 वर पोहोचली.

शनिवारी राज्यातील एकूण बाधितांची संख्या 384 वर पोहोचली असून यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी बेळगाव शहरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर कॅम्पबरोबरच संगमेश्वरनगर येथील आस्मा कॉलनी व अमननगर परिसरात जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

शनिवारी जिल्हय़ातील पहिल्या रुग्णाला विलगीकरण कक्षातून घरी जाऊ देण्यात आले. त्याचवेळी हिरेबागेवाडी येथील आणखी एका युवकाची भर पडली. जिल्हा सर्वेक्षण विभागाने सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार जिल्हय़ात एकूण 2040 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून 326 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

 सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 44 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ात एकूण 749 संशयितांचे स्वॅब जमविण्यात आले होते. यापैकी 42 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 534 जणांचा निगेटिव्ह आला आहे. प्रशासनाला आणखी 171 अहवालांची प्रतीक्षा आहे.

खासकरून हिरेबागेवाडी, कुडची, कॅम्प परिसरात कोरोनाबाधितांच्या संपर्कातून लागण झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान, शुक्रवारी ज्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या संपर्कातील लोकांनाही प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये हलविले असून त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे.

तपासणीसाठी आलेले गावकरी अडकले

हुक्केरी तालुक्मयातील निडगुंदी येथून कोरोना तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांसह पाच जण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अडकले. परगावाहून आलेल्या एका मुलामुळे गावकऱयांनी या कुटुंबीयांना तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. तेथील आशा कार्यकर्त्यांसमवेत दोन महिला व तीन पुरुषांना हुक्केरी तालुका इस्पितळात पाठविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी 108 रुग्णवाहिकेतून बेळगावला पाठविले. आयएमए हॉलमधील फ्लू कॉर्नरमध्ये या सर्व पाच जणांची तपासणी करण्यात आली. त्यांना कसलीच लक्षणे नसल्यामुळे डॉक्टरांनी घरी जाण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत त्यांना घेऊन आलेली रुग्णवाहिका हुक्केरीला परतली होती. त्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अडकून पडले.

Related Stories

चक्क गटारीमधून घातल्या विद्युत वाहिन्या

Patil_p

कल्मेश्वर सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Patil_p

उचगाव-कोनेवाडी मार्गावरील भैरवनाथ मूर्ती प्रतिष्ठापना आज

Patil_p

लोकअदालतमध्ये 11 हजार 204 खटले निकालात

Omkar B

विधानपरिषद निवडणुकीसाठी अनुभवी अधिकाऱयांची नियुक्ती करा

Amit Kulkarni

फुटपाथ रिकामी करण्याची फेरीवाल्यांना सूचना

Amit Kulkarni
error: Content is protected !!