22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

जगभरात 23 लाख 31 हजार कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची आतापर्यंत 23 लाख 30 हजार 986 जणांना बाधा झाली आहे. तर 1 लाख 60 हजार 757 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 लाख 96 हजार 687 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.जगभरातील 200 देशांमधील ही आकडेवारी आहे.
 

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 लाख 38 हजार 830 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 39 हजार 014 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर इटलीमध्ये कोरोनाचेसर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इटलीत आतापर्यंत 1 लाख 75 हजार 925 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 23 हजार 227 जण दगावले आहेत.

स्पेनमध्ये 1 लाख 94 हजार 416 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 20 हजार 639 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही 15 हजार 722 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 521 जण दगावले आहेत. तर 2463 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 12 हजार 738 ऍक्टिव्ह केसेस आहेत.

Related Stories

अमेरिकेत बायडन पर्वाचा प्रारंभ

Patil_p

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन

triratna

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत, पंकजा मुडेंनी परळी दौरा केला रद्द

pradnya p

अमेरिकेची सूत्रे हाती घेण्यास बायडन सज्ज

Patil_p

अमेरिकेत बाधितांची संख्या 3 कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav

‘पीएसएलव्ही-सी 51’चे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav
error: Content is protected !!