तरुण भारत

गुंजित रेल्वे कर्मचाऱ्याचा डोक्यात वार करून खून

वार्ताहर/गुंजी

गुंजी तालुका खानापुर जिल्हा बेळगाव येथे रेल्वे कर्मचाऱ्याचा फावड्याने डोक्यात वार करून खून केल्याची घटना आज रविवार दिनांक 19 रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. मष्णू धाकलू झेंडे वय 50 राहणार गुंजी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेत जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी, उपनिरीक्षक बसनगौडा पाटील आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मष्णू हे सकाळी शेतातील कामात व्यस्त असताना पाठीमागून आलेल्या एका इसमाने कावळ्याने डोक्यात वार केला. मार वर्मी लागल्याने रक्तस्राव होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या शेतमजूरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. खानापूर सरकारी दवाखान्यात मृतदेह हलवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisements

Related Stories

मुतगा येथे कारवाईत मटकाबुकीला अटक

Omkar B

बार असोसिएशनच्यावतीने पुन्हा कोरोना लसीकरण

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात साडेतीन हजार अहवाल निगेटिव्ह

Rohan_P

अनमोड येथे अरण्य प्रदेशात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका बैलाचा बळी

tarunbharat

स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये क्वारंटाईनला नागरिकांचा विरोध

Patil_p

बेळगावसह 14 जिल्हय़ांमध्ये मुलींचे प्रमाण घटतेय!

Amit Kulkarni
error: Content is protected !!