तरुण भारत

पालघर हत्या : लज्जास्पद कृत्यातील आरोपींवर कडक कारवाई करणार : उध्दव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई :

पालघर मध्ये चोरीच्या संशयातून तिघांच्या हत्येप्रकरणी दोषींवर शक्य तितकी कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुखयमंत्री उध्दव ठाकरे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. 

गुरुवारी रात्री पालघर मध्ये गावातील लोकांनी तीन साधूंना चोर समजून ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले असून कारवाई सुर करण्यात आली आहे. 

या प्रकरणी 101 आरोपींना ताब्यात घेतले असून उच्चस्तरीय चौकशी चे आदेश देण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. 


पालघर येथील घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना कडक शिक्षा करण्यात येईल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.  

Related Stories

नौदलाचे 21 जवान कोरोनाग्रस्त

Patil_p

शहीद जवान दीपक कुमारच्या परिवारास मध्य प्रदेश सरकारकडून 1 कोटी रुपयांची मदत

pradnya p

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन

pradnya p

मध्यप्रदेश : राज्यसभा निवडणुकीत सहभागी झालेले भाजपचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 2.5 लाखांवर

datta jadhav

महाराष्ट्र : ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p
error: Content is protected !!