तरुण भारत

चढउताराच्या सत्रात सेन्सेक्स तेजीत

वृत्तसंस्था / मुंबई  :

मागील आठवडय़ात मागील दोन दिवसांच्या सत्रात तेजीचे वातावरण भारतीय शेअर बाजारात राहिले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय रिझर्क्ह बँकेने कोरोना संकटात अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद केली आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजारात तेजी राहिली होती. आता चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी मात्र बीएसई सेन्सेक्सचा प्रवास चढउताराचा करत अंतिम क्षणी 59.28 टक्क्मयांनी वधारला आहे तर चढउतारातील प्रवास 566 अंकांवर झाला आहे.

Advertisements

दिवअखेर सेन्सेक्स 59.28 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,648.00 वर बंद झाला आहे, दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 4.90 अंकांनी घसरण होत 9,261.85 वर बंद झाला आहे. सोमवारी दिग्गज कंपन्यांमध्ये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक 4 टक्क्मयांनी सर्वाधिक तेजीत राहिलेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. सोबत आयटी क्षेत्रातील कंपन्यांचेही समभाग फायद्यात असून यातील इन्फोसिसच्या समभागानी 3 टक्क्मयांनी उसळी  घेतली आहे.

कोरोना संकटामुळे मागील महिन्यातील शेवटच्या आठवडय़ापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे याच कालावधीत तिमाही नफा कमाईचे कंपन्यांचे अहवाल सादर केले जात असून यांचा काही प्रमाणात प्रभाव शेअर बाजारातील कामगिरीवर होत असतो. यामध्ये एचडीएफसी बँकेचा तिमाही अहवाल सकारात्मक सादर झाल्याने बँकिंग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा आगामी काळातही होण्याचे संकेत आहेत. तसेच सन फार्मा, एनटीपीसी, एचसीएल, टेक महिंद्रा, एचडीएफसी, टीसीएस यांचे समभाग तेजीत राहिले तर दुसरीकडे ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले. आयटीसी,आयसीआयसीआय बँक आणि मारुती सुझुकी यांचाही घसरणीत समावेश झाला आहे.  परंतु जागतिक पातळीवर कमजोर वातारण राहिल्याने व्यावसायिकांनी नफा कमाई केल्यामुळे घसरण राहिली होती.

Related Stories

अंतिम दिवशी सेन्सेक्स 984 अंकांनी कोसळला

Patil_p

‘गोएअर’चा आयपीओ लवकरच

Patil_p

सक्रीय ग्राहक संख्या जोडण्यात एअरटेल अव्वल

Amit Kulkarni

उत्तर पश्चिम रेल्वेचा विक्रम

Amit Kulkarni

देशाचा चीनसोबतचा व्यापार घटला

Patil_p

बँक-आयटी कंपन्यांच्या समभाग विक्रीने सेन्सेक्स तेजीत

Patil_p
error: Content is protected !!