तरुण भारत

लंडनस्थित डिचोलीतील इसमाचा कोरोनामुळे मृत्यू

सोमवारी सकाळी झाला मृत्यू : 15 वर्षांपासून होते युकेला : पूत्र व कन्याही लंडनलाच असून विलगीकरणात

डिचोली / प्रतिनिधी

Advertisements

   गावकरवाडा डिचोली येथील उमेश विष्णू नारूळकर या 60 वषीय इसमाचा लंडन (युके) येथे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याची घटना सोम. दि. 20 एप्रिल रोजी घडली. भारतीय वेळेनुसार सदर मृत्यू 10.30 वा. ते उपचारासाठी दाखल असलेल्या इस्पीतळात झाल्याची माहिती मिळाली आहे. मयत उमेश यांच्याबरोबर त्यांचे पूत्र व कन्याही लंडनमध्ये राहत होती. त्यांना सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरानामुळे गोमंतकीय इसमाचा मृत्यू होण्याची ही संपूर्ण गोव्यातील प्रथमच घटना असावी.

   उमेश नारूळकर हे गेली 15 वर्षे युकेदा होते. ते एका कंपनीत काम करत होते. तर त्यांचा पूत्र साईराज (वय 27) व कन्या दिक्षा (वय 25) याही त्यांच्याबरोबर कामानिमित्त युकेलाच राहत होते. त्यांची पश्चात पत्नी करूणा या घरातच होत्या. तर त्यांना संतोष व उदय असे दोन भाऊ व सुकांती मेघश्याम सावंत ही बहिण आहे.

 9 एप्रिल रोजी इस्पीतळात दाखल तर 14 नंतर व्हेंटिलेटरवर

   उपलब्ध माहितीनुसार उमेश यांना 25 मार्च रोजी सर्दी झाल्याचे जाणवल्यानंतर त्यांना 29 मार्च रोजी तपासणीसाठी इस्पीतळात नेण्यात आले होते. तेथे त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा हलकासा संशय असल्याने त्यांना घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडत चालल्याने त्यांना 9 एप्रिल रोजी इस्पीतळात एडमीट करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि त्यांना श्वासोच्छवासाला त्रास होऊ लागल्याने त्यांना 14 एप्रिल पासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

14 एप्रिल रोजी पत्नीशी केले होते अखेरचे संभाषण

  उमेश नारूळकर यांना लंडनमधील इस्पीतळात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी इस्पीतळातून 14 एप्रिल रोजी आपली पत्नी करूणा यांच्याशी फोनवरून संभाषण केले होते. या संभाषणानंतर त्यांना इस्पीतळात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही आणि त्यांची व त्यांच्या पत्नीचेही पुन्हा संभाषण होऊ शकले नाही. 14 रोजी झालेले संभाषण हे या पती पत्नीमधील अखेरचे संभाषण ठरले. तर त्याच दिवशी लंडनमध्ये असलेल्या आपल्या साईराज व दिक्षा या मुलांशीही त्यांची आई करूणा यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण केले होते.

  उमेश यांचा मृत्यू आणि गावकरवाडय़ावर शोककळा

  9 एप्रिल रोजी उपचारार्थ इस्पीतळात दाखल करून घेण्यात आल्यानंतर 14 पासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या आजारातून ते बाहेर येऊ शकले नाही आणि काल सोम. दि. 20 एप्रिल रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार 10.30 वा. त्यांची इस्पीतळात प्राणज्योत मालावली. त्यांचे पार्थिव इस्पीतळातून बाहजर काढण्याच्या सोपस्कराला 24 ते 48 तास जाणार असून हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे त्यांच्यावर लंडनमध्येच अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    या घटनेची माहिती गावकरवाडा डिचोली येथे पसरताच गावकरवाडय़ार शोककळा पसरली सुस्वभावी असलेले उमेश हे लोकांशी चांगली संबंध ठेऊन होते. त्यांच्या मृत्यूमुळे वाडय़ावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

म्हार्दोळ भीषण अपघात वृद्ध ठार : दोघे पुत्र गंभीर जखमी

Amit Kulkarni

करंझोळ गावात सागवानी झांडाची बेकायदा कत्तल

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात 75 टक्के मतदान.

Patil_p

मंत्री जावडेकरांच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

Patil_p

आरोही वेरेकरचे ऑनलाईन स्पर्धेत यश

Patil_p

केरी सातेरी आजोबा देवस्थानच्या गावकर समाजावर अन्याय होत असल्याचा दावा.

Omkar B
error: Content is protected !!