तरुण भारत

पीएम किसानमध्ये 15 हजार द्या : स्वामीनाथन फाउंडेशन

सद्य परिस्थितीत आणखी मदतीची गरज

नवी दिल्ली  :

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देश आरोग्य क्षेत्राला सक्षम करत आहे. त्यासाठी लॉकडाऊनची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच जीवनावश्यक घटकांना यात सवलत दिली असल्याचेही पहावास मिळत आहे. यासाठी रिझर्व्ह बँक आणि अन्य राज्य सरकारे विविध आर्थिक मदतीची घोषणा करत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून ही मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. यातच प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या मदतीने देण्यात येणाऱया मदतीत आणखीन 15 हजार रुपये प्रत्येक वर्षाला देण्यात यावी अशी सुचना  स्वामीनाथन रिसर्च फांउडेशनने केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून जास्त उत्पन्न असणाऱया शेतकऱयांना वगळून सर्व शेतकऱयांना तीन टप्प्यात ही मदत प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये इतकी थेट शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सदरची रक्कम ही सध्याची देशातील कोरोना संकटाची स्थिती आणि अन्य वाढत्या खर्चाचा ताळमेळ पाहता कमी पडते आहे. भाजीपाला व फळे यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून ही रक्कम पुरेशी नसून ती वाढविण्यासाठी स्वामीनाथन फाउंडेशन यांच्याकडून सल्ला देण्यात आला आहे.

Related Stories

कॅफे कॉफी डेची 280 केंद्रे बंद

Patil_p

पारदर्शक स्मार्ट टीव्ही शाओमीकडून सादर

Patil_p

एमजी मोटारने विकल्या 710 कार्स

Patil_p

शाओमीकडून नोटबुक 14 सादर

Patil_p

एलआयसीचे नव्या प्रीमियममधून उत्पन्न वाढले

Patil_p

तंत्रज्ञान-दूरसंचार कंपन्यांमुळे बाजार तेजीत

Patil_p
error: Content is protected !!