तरुण भारत

ऑनलाइन गेम्सना अच्छे दिन…..

 10 टक्के वाढ : फेसबुकचे नवीन गेम ऍप सादर

नवी दिल्ली  :

सध्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा देणारे लोक वगळता अन्य लोक  आपल्या घरांमध्ये बंदीस्त आहेत. या कालावधीत आपला वेळ घालविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाइन गेम खेळण्याचा पर्याय निवडला आहे. प्रामुख्याने विनजोवर लुडो आणि कॅरम यासारख्या गेम्स खेळणाऱयांची संख्या जवळपास 10 टक्क्मयांनी वधारली आहे तर फेसबुकने अँड्रॉइड ग्राहकांसाठी नवीन गेमचे ऍप सादर केले आहे. याला फेसबुक गेमिंग असे नावही दिले आहे.  प्ले स्टोअरवर हे गेम ऍप 50 लाखापेक्षा अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

12 भाषांची सुविधा

विनजो या प्लॅटफॉर्मवर लुडो, कॅरम आणि बुद्धीबळ यासारख्या गेम्सची निर्मिती 12 भाषांमध्ये करण्यात आली आहे. तसेच या खेळात आपल्या मित्रांनाही सोबत जोडण्याची सोय उपलब्ध करुन दिली असून याचा फायदा अनेकांना उत्तमपणे उठवता येतो आहे.

ग्राहकांची संख्या वधारली

विनजो गेम्स खेळण्यासाठी जवळपास 5 पटीने ग्राहकांची संख्या वाढली असल्याचे नोंदवले आहे. चालू महिन्यात हे गेम्स लाईव्ह करण्याची योजना आखण्यात येणार असल्याचे विनजो गेम्सचे सहसंस्थापक पावन नंदा यांनी सांगितले आहे. 

Related Stories

देशांतर्गत बाजारासाठी 16 मार्च ठरला ‘ब्लॅक मंडे’

tarunbharat

15 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याची पाकिस्तानची योजना

Patil_p

जीओनीची स्मार्टवॉचेस बाजारात

Patil_p

फार्मइझीमधील वाटा टीपीजी खरेदी करणार

Patil_p

‘स्टेट बँके’चं‘सुकाणू’ नव्या चेहऱयांकडे!

Omkar B

बीएसएनएलची नवी सेवा आता मुंबईत दिल्लीमध्येही

Omkar B
error: Content is protected !!