तरुण भारत

नेपाळमध्ये जिह्यातील गलाई कामगार आडकले

प्रतिनिधी/ म्हसवड

सांगली, साताऱयातील गलाई बांधव नेपाळमध्ये अडकले असून त्यांची व्यवस्था करावी. तसेच दुष्काळी भागातील लोकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या व्यवसायात जम बसवला आहे. देशाच्या कानाकोपऱयात या भागातील गलाई बांधव भेटतात. नेपाळमध्ये अडकलेल्या सांगली, सातारा जिह्यातील गलाई बांधवांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, आमदार महादेव जानकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातील अनेक गलाई बांधव नेपाळमध्ये अडकले असल्याची माहीती आमदार जानकर यांना समजल्यावर त्यांनी प्रधान सचिव विकास खारगे यांना पत्र पाठवून कामगारांची व्यथा मांडली आहे.

Advertisements

 मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात जानकर यांनी म्हटले आहे की, सांगली आणि सातारा जिह्यातील गलाई बांधव नेपाळ येथे विविध धातूंच्या कच्चा मालावर प्रक्रिया करण्यासाठी गेले असताना लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे ते कामगार नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे उपासमार सुरू आहे. त्यांच्या जेवणाची नेपाळमध्ये सोय व्हावी, तसेच त्यांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. सांगली, सातारा जिह्यातील हजारो गलाई कामगार दक्षिण आणि उत्तर भारतात आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात ते गावी येतात. पण यावर्षी कोरोनामुळे गलाई बांधवाना येता आलेले नाही. या दरम्यानच्या काळात काहींच्या घरी दुःखद प्रसंग घडले तरीही येता आलेले नाही.    केरळ राज्यात कालिकतमध्ये असलेल्या सचिन शिंदे यांनी सांगितले. गावाकडे यायची अनेकांना गरज आहे. पण घराबाहेर पडता येत नाही. मग गावाकडे कसं येणार? लॉकडॉऊन नक्की किती दिवस चालणार, हे माहिती नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. सातारा जिह्यातील माण, खटाव, सांगली जिह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि सोलापूर जिह्यातील सांगोला या तालुक्यातील लोक गलाई व्यवसायात आहेत

Related Stories

पालिकेत विषय समितीच्या सभापती निवडी बिनविरोध

Patil_p

गांजा प्रकरणातील आरोपींचा कारागृहात धिंगाणा

Patil_p

कोल्हापूर जिल्हय़ात 12 बळी, 702 पॉझिटिव्ह

triratna

सोलापूर ग्रामीण भागात 171 कोरोना रुग्णांची भर

Shankar_P

सातारा : वडूज – मायणी पोलिसांची अवैध दारू, जुगार अड्डयावर कारवाई, १७ जणांवर गुन्हा दाखल

triratna

कासचे पाणी दोन दिवस बंद राहणार

triratna
error: Content is protected !!