तरुण भारत

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 25 लाख 65 हजारांवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची आतापर्यंत 25 लाख 65 हजार 879 जणांना बाधा झाली आहे. तर 1 लाख 77 हजार 789 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 लाख 96 हजार 661 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

Advertisements

 अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख 19 हजार 175 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 45 हजार 343 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर इटलीमध्ये कोरोनाचेसर्वाधिक बळी गेले आहेत. इटलीत आतापर्यंत 1 लाख 83 हजार 957 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 24 हजार 668 जण दगावले आहेत.

स्पेनमध्ये 2 लाख 04 हजार 178 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 21 हजार 282 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही 20 हजार 178 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 645 जण दगावले आहेत. तर 3976 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 15 हजार 557 ऍक्टिव्ह केसेस आहेत.

Related Stories

भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा

datta jadhav

दरवाज्यावर अमेझॉनच्या बॉक्सचा ढिग

Patil_p

बचेंगे तो और भी लढेंगे – संजय राऊत

Sumit Tambekar

‘अलिबाबा’ला दणका; ठोठावला तब्बल 18.2 अब्ज युआनचा दंड

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 54,535 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

महाराष्ट्रात दुकाने, मार्केट सुरू ठेवण्यास आता 2 तास वाढीव परवानगी

Rohan_P
error: Content is protected !!