तरुण भारत

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 380 रुग्णांची भर 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 380 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 19 हजार 984 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 640 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 50 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 15 हजार 474 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

Advertisements

एएनआय च्या सुत्रानुसार, सरकार कडून रोज दुपारी होणारी परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मिळाल्या माहितीनुसार, देशातील कोरोना व्हायरस संबधित रोज दुपारी चार वाजता घेण्यात येणारी पत्रकार परिषद आता आठवड्यातून चार वेळा ठराविक दिवशी घेतली जाणार आहे. त्यामुळे आज होणारी परिषद रद्द करण्यात आली आहे. असे सांगण्यात आले आहे.

Related Stories

‘लस उत्सवा’वर राहुल गांधींची टीका

Amit Kulkarni

रेल्वे खासगीकरणासाठी कंपन्यांचा उत्तम प्रतिसाद

Patil_p

नौसेनेचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

दिल्ली दंगल : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक

datta jadhav

केंद्र सरकारचा पुन्हा शेतकऱयांसमोर प्रस्ताव

Omkar B

मध्यप्रदेशने संमत केला धर्मपरिवर्तन विरोधी कायदा

Patil_p
error: Content is protected !!