तरुण भारत

संकेश्वरमध्ये राखीव पोलीस दल तैनात

‘त्या’ 11 जणांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह : आणखी 60 जणांना क्वारंटाईन

प्रतिनिधी / संकेश्वर

Advertisements

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या संकेश्वर येथील त्या व्यक्तीच्या कुटुंबातील 11 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता 27 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यातील या सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. याशिवाय बुधवारी आणखी 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बुधवारपासून सीलडाऊन आणखी कडक करण्यात येत असून, शहरात राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

निजामुद्दिन येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून संकेश्वर येथे परतलेल्या त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 60 जणांचा शोध घेऊन आरोग्य खात्याने त्यांना यापूर्वीच क्वारंटाईन केले आहे. मंगळवारी या व्यक्तीच्या बेळगाव येथील मुलगीचाही कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने, आणखी कोणी त्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते का? याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. क्वारंटाईन असलेल्यांवर लक्ष ठेवले जात आहे.

आज 8 ते 12 बाजारपेठ खुली राहणार

गुरुवारपासून दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील किराणा व भाजीपाला दुकाने खुली राहणार असून दुपारी 12 नंतर बाजारपेठ बंद असणार आहे. या काळात कोणीही घराबाहेर दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी सकाळच्या सत्रात आवश्यक वस्तूंची खरेदी करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्यांना मोफत तांदूळ पुरवठा

Patil_p

आणखी 59 जणांचे स्वॅब तपासणीसाठी रवाना

Patil_p

सरकारी नियमानुसार बकरी-ईद

Rohan_P

कॅन्टोन्मेंट वगळून शहरात चोवीस तास पाणी योजना

Amit Kulkarni

चक्रीवादळाच्या धोक्मयामुळे गांधीधाम एक्स्प्रेस रद्द

Patil_p

आदर्श महिला मंडळातर्फे वर्धापन दिन-महिला दिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!