तरुण भारत

केरळ ब्लास्टर्सच्या प्रशिक्षकाची उचलबांगडी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आयएसएल प्रँचायझी केरळ ब्लास्टर्सने मुख्य प्रशिक्षक इल्को स्कॅटोरी यांची एकाच हंगामानंतर प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी केली. बुधवारी त्यांनी या निर्णयाची घोषणा केली. मूळचे डचमन असणारे स्कॅटोरी 2019-20 हंगामासाठी कोचीस्थित केरळ संघाचे प्रशिक्षक राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

Advertisements

48 वर्षीय स्कॅटोरी 2012 मध्ये भारतीय भूमीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी कोलकातास्थित प्रयाग युनायटेड संघाच्या प्रशिक्षणाची धुरा स्वीकारली. नंतर त्यांनी आयएफए शील्ड चषक जिंकून देण्यात तसेच आयलीगमध्ये चौथ्या स्थानी झेप घेण्यात प्रशिक्षक या नात्याने मोलाचा वाटा उचलला. 2015 मध्ये कोलकाता जायंट्स ईस्ट बंगाल संघाचे काम पाहिल्यानंतर त्यांनी 2016 आयएसएल हंगामासाठी नॉर्थ ईस्ट युनायटेडकडे मोर्चा वळवला.

नंतर 2018-19 मध्ये ते मुख्य प्रशिक्षक बनले. गुवाहाटीस्थित नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाने क्लबची स्थापना झाल्यानंतर प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम त्यांच्या मार्गदर्शनामुळेच केला होता. पुढे 2018-19 मध्ये स्कॅटोरीनी केरळ ब्लास्टर्सच्या प्रशिक्षकपदी नेलो विंगाडा यांची जागा घेतली. पण, जे यश नॉर्थ ईस्ट युनायटेडला मिळवून दिले, त्याची पुनरावृत्ती त्यांना केरळ ब्लास्टर्स संघासाठी करता आली नाही.

Related Stories

अमेरिका, चिली, मलेशियन हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये दाखल

Patil_p

रियल माद्रीदकडे स्पॅनीश सुपर चषक

Patil_p

टोकियो ऑलिंपिक ड्रॉमध्ये भारताच्या चार मल्लांना सिडिंग

Patil_p

कोनेरु हंपीला 12 वे स्थान

Patil_p

जोकोविच, केनिन-मुगुरुझा अंतिम फेरीत

Patil_p

न्यूझीलंड युवा संघ उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!