तरुण भारत

वेस्टहॅम, पॅलेस यांचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणारे वेस्टहॅम युनायटेड आणि क्रिस्टल पॅलेस फुटबॉल क्लबनी जुलै महिन्यातील आपला ऑस्ट्रेलिया दौरा कोरोना व्हायरस महामारीमुळे बेमुदत लांबणीवर टाकला आहे.

Advertisements

ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड येथे होणाऱया पहिल्या क्विन्सलँड चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पर्धेत वेस्टहॅम युनायटेड आणि क्रिस्टल पॅलेस हे क्लब सहभागी होणार होते. या दोन्ही फुटबॉल संघांचा सामना ब्रिस्बेन रोअर क्लबबरोबर आयोजित केला होता. क्विन्सलँडमधील ही प्रदर्शनीय फुटबॉल स्पर्धा 11 ते 18 जुलै दरम्यान तीन शहरामध्ये खेळविली जाणार होती. आता कोरोना व्हायरसमुळे वेस्टहॅम आणि क्रिस्टल पॅलेस यांनी आपला ऑस्ट्रेलिया दौरा बेमुदत लांबणीवर टाकला असल्याची घोषणा बुधवारी केली.

Related Stories

माजी मल्ल गॅस्पार्ड मृतावस्थेत

Patil_p

जपानच्या ओसाकाच्या मानांकनात घसरण

Patil_p

फिनिक्स मास्टर्स लीग टी-20 चषकाचे अनावरण

Omkar B

मल्लांसाठी कसरत व्हीडिओ स्पर्धा

Patil_p

हॅम्बुर्ग टेनिस स्पर्धेत बुस्टा विजेता

Patil_p

अवनी लेखराने रचला नवा इतिहास!

Patil_p
error: Content is protected !!