तरुण भारत

शेफिल्ड युनायटेड खेळाडूंची वेतन कपातीला मान्यता

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत  खेळणाऱया शेफिल्ड युनायटेड क्लबच्या फुटबॉलपटूंनी देशातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या वेतनश्रेणीच्या रक्कमेत तसेच बोनस रक्कमेच्या कपातीला आपली कबुली दिली आहे. सदर निर्णय शेफिल्ड युनायटेड संघाच्या खेळाडूंनी मंगळवारी घेतला.

Advertisements

 शेफिल्ड युनायटेड क्लबचे व्यवस्थापक ख्रिस विल्डेर तसेच या क्लबचा प्रशिक्षण वर्ग आणि सीईओ स्टीफेन बेटीस यांच्यासह या क्लबच्या खेळाडूंनी सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या वेतनात तसेच बोनस रक्कमेत कपात करण्यास तयारी दर्शविली आहे. वेस्टहॅम युनायटेड, अर्सेनेल या फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी आपल्या वेतनश्रेणीमध्ये 12.5 टक्के रक्कम कपात करण्याला मान्यता दिली आहे.

Related Stories

बेल्जियमचा स्पेनवर विजय

Patil_p

रोनाल्डोचा वाढदिवस अन् कोल्हापूरी चाहत्यांची सामाजिक बांधिलकी

Abhijeet Shinde

लंकेचे विंडीजला 375 धावांचे आव्हान

Amit Kulkarni

भारतीय मुष्टियुद्ध संघ दुबईत दाखल

Patil_p

न्यूझीलंडमधील क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणात बदल

Patil_p

अँटवर्प संघाकडे बेल्जियन फुटबॉल चषक

Patil_p
error: Content is protected !!