तरुण भारत

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे दिल्ली, मुंबईत अनेक स्तरांवर प्रयत्न

पणजी / प्रतिनिधी

मुंबईत जहाजांवर अडकून पडलेल्या गोव्यातील खलाशांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱया केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल राज्यात अनेकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Advertisements

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मुरलीधरन यांची सोमवारी भेट घेऊन गोवा आणि देशातील इतर भागातील समुद्र तसेच जगातील विविध भागात अडकलेल्या खलाशांच्या प्रश्नावर चर्चा केली. आवश्यक परवानग्या त्वरित आणण्यासाठी त्यांनी जहाजबांधणीमंत्री मनसुख मांडवीया आणि गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांचीही भेट घेतली. गेले तीन दिवस नाईक प्रयत्न करत आहेत. सर्व खलाशांना त्यांच्या घरी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी गोव्यातील अनेकांना दिले होते. नाईक यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना तसेच अधिकाऱयांना स्वतः भेटून बोटीवरील खलाशांना परत आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले असून लवकरच ते फलद्रुप होणार आहेत.

भारतीय खलाशांना किनाऱयावर आणणार

गृह मंत्रालयानुसार (एमएचए) भारतीय बंदरांवर भारतीय समुद्री जहाजांचे साइन-इन आणि साइन-ऑफ करण्यासाठी Standard Operating Procedure  (SoP) नुसार 21 एप्रिल 2020 रोजी उशिरा रात्री, भारतीय किनाऱयाभोवती विविध क्रूझ बोट / लाइनर इ. मधील गोव्यातील तसेच देशातील खलाशांना किनाऱयावर  आणले जाईल किंवा काळजीपूर्वक दुसऱया जहाजातू आणले जाईल.

आयुषमंत्र्यांकडून अनेक स्तरांवर प्रयत्न

आयुषमंत्री नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री जयशंकर, परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन, जहाजबांधणीमंत्री मनसुख मंडावीय यांच्याकडे भारतीय बंदरशेजारील वेगवेगळय़ा जहाजांवर अडकलेल्या समुद्री खलाशांना वेळेवर मदत देण्यासाठी व त्यांना गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.  खलाशांना होणारा त्रास संपेल आणि सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत जाण्याचा मार्ग मोकळा होईल, असे नाईक यांनी म्हटले आहे.

जहाजावर अडकलेल्या गोमंतकीय खलाशांना सुखरूप राज्यात आणण्यासाठी केंद्रीय आयुषमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे. राज्य सरकारचेही आपण आभार मानत आहे, असे जीना परेरा यांनी कळविले आहे. त्यांचे पती मारेला डिस्कवरी या जहाजावर असून त्यांना गोव्यात आणा, अशी विनंती परेरा यांनी नाईक यांच्याकडे केली होती.

Related Stories

अखेर आठ महिन्यानंतर म्हापसा बाजारपेठ सुरू

Patil_p

दुबई व लंडनहून 337 प्रवासी गोव्यात दाखल

Omkar B

संतोबा देसाई ग्रुपतर्फे मजुरांच्या जेवणाची सोय

Omkar B

सावर्डे शारदा इंग्लिश हायस्कूलच्या नवीन इमारतीचे आज उद्घाटन

Amit Kulkarni

मायकल लोबो समर्थकांसह काँग्रेसमध्ये

Amit Kulkarni

शंभर रुपयांच्या आईस्क्रिममुळे बनावट नोटा टोळीचा पर्दाफाश

Patil_p
error: Content is protected !!