तरुण भारत

‘सांगते ऐका’ मध्ये सोनालीबद्दल न ऐकलेल्या गोष्टी

‘नटरंग’ पासून हिरकणीपर्यंत ज्या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वतःच्या प्रेमात पाडले, अशी सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या लॉकडाऊनच्या काळात तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळी ट्रीट घेऊन येत आहे. असं म्हणतात, या जगात आपल्या सर्वांकडे दोन चेहरे असतात. एक चेहरा जो घेऊन आपण समाजात सर्वत्र वावरत असतो आणि दुसरा चेहरा जो केवळ आपल्या आयुष्यातील खूप खास लोकांना माहीत असतो. मनोरंजनाच्या क्षेत्रात असताना कलाकारांनासुद्धा असे दोन चेहरे घेऊन त्यांच्या चाहत्यांसमोर जावं लागतं आणि खरा चेहरा झाकावा लागतो. मात्र, सोनाली कुलकर्णी हिची ओळख नेहमीच एक विद्रोही प्रकारच्या कलाकारांमध्ये मोडते. अतिशय कठीण भूमिका ती स्वतः शोधते आणि कोणीही कधीही करू शकणार नाही अशाप्रकारे ती त्या भूमिका निभावून एक इतिहास बनवते.

सोनाली कुलकर्णी तिच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आता तिच्या आवाजासोबत  डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहे. हॅशटॅग कनेक्ट या कंपनीने या लॉकडाऊनच्या काळात सोनालीच्या चाहत्यांसाठी एक वेगळी भेट देऊ केली आहे. हब हॉपर या ऍपच्या माध्यमातून ‘सांगते ऐका’ हा एक नवा कोरा कार्यक्रम ते घेऊन आले आहेत. हॅशटॅग कनेक्टने या पॉडकास्टची निर्मिती केली आहे. या ऍपच्या माध्यमाने ती प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. तिच्या आयुष्यातील  कोणालाही न माहीत असलेल्या, न ऐकलेल्या अशा घटना ज्या तिने आजवर कोणाकडेही सांगितल्या नाहीत किंवा कोणत्याही मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं नाही अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तिच्या प्रेक्षकांना सांगणार आहे. एक साधारण मुलगी ते एक सेलेब्रिटीपर्यंतचा तिचा प्रवास तिच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे.

Advertisements

पॉडकास्ट म्हणजे आपण ज्याप्रमाणे लहानपणी एक डायरी लिहायचो स्वतःबरोबर घडलेल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपण त्या डायरीत साठवून ठेवायचो  आणि ती डायरी कोणाच्याही हातात पडणार नाही याची काळजी घ्यायचो. त्याचप्रकारची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची स्वतःची, तिच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट अनुभवांची, आयुष्यात भेटलेली चांगली वाईट माणसे मग ते मनोरंजन क्षेत्राशी निगडित असतील किंवा राजकारणी. अशा आयुष्यात भेटलेल्या वेगवेगळय़ा लोकांच्या अनुभवांबद्दल पहिल्यांदाच एका ऑडिओ डायरीद्वारे स्वतःच्या आवाजात सर्व रेकॉर्ड करून ती सांगणार आहे. हॅशटॅग कनेक्ट या कंपनीने जसे सोनाली कुलकर्णीचा
पॉडकास्ट तयार केला तसाच आणखीही काही नावाजलेल्या कलाकारांचे
पॉडकास्ट तयार करणार आहेत. या पॉडकास्टबद्दल सोनाली कुलकर्णीला विचारले असता तिने सांगितले, मला कधीच दोन चेहरे घेऊन वावरायला आवडत नाही. मी जेसुद्धा करते ते अगदी सरळ आणि सर्वांच्या समोर करते. काही गोष्टी सांगण्यासाठी मात्र योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि मला वाटतं आता ती वेळ आली आहे. कलाकाराचं आयुष्य हे किती चढउतारांचं असतं हे तुम्हाला माझा
पॉडकास्ट ऐकून समजेल ही आशा करते आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही माझ्यावर असेच प्रेम करत राहा ही सर्व माझ्या चाहत्यांना विनंती करते.

Related Stories

कलाकाराच्या पत्नीची द्विधा मन:स्थिती द आर्टिस्ट वाईफ

Patil_p

मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव याला कोरोनाची लागण

Rohan_P

सोनाक्षी सिन्हाचे नशीब उजळणार

Patil_p

24 डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘अतरंगी रे’

Patil_p

इन्स्टाग्रामवर जरीनचे 1 कोटी फॉलोअर्स

Patil_p

सुपरस्टारला आंघोळीचा तिटकारा

Patil_p
error: Content is protected !!