तरुण भारत

भारताने नेपाळला पाठवली 23 टन औषधे

ऑनलाईन टीम / काठमांडू : 

कोरोनाच्या संकटात भारताने नेपाळला 23 टन अत्यावश्यक औषधे पाठवली आहेत. याबद्दल नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
 

Advertisements

केपी शर्मा ओली यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी भारताने नेपाळला 23 टन अत्यावश्यक औषधे पाठवली आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी आभार मानतो. भारतीय राजदूतांनी आमच्या आरोग्यमंत्र्यांकडे ही औषधे सुपूर्त केली.’


पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावर एक ट्विटही केले आहे, त्यामध्ये मोदी म्हणतात, ‘भारत आणि नेपाळमधील संबंध खास आहेत. या नात्यांची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. संकटकाळात भारत नेहमीच नेपाळच्या पाठीशी उभा राहील.’

Related Stories

अफगाणिस्तानात कारचा स्फोट; 9 ठार, 20 जखमी

datta jadhav

घामाने चार्ज होणार स्मार्टवॉच अन् मोबाईल

Patil_p

कॅनडात 12-15 वयोगटातील मुलांचे लसीकरण

Amit Kulkarni

जग फिरून चिमुकला करतोय मोठी कमाई

Amit Kulkarni

सीरिया : निर्बंध हटविणार

Patil_p

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

Patil_p
error: Content is protected !!