तरुण भारत

अमरनाथ यात्रेबाबत संभ्रम कायम

ऑनलाईन टीम / जम्मू : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही नाट्यमय घडामोडीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आल्याने लोकांमध्ये यात्रेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisements

तेवीस जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय अमरनाथ बोर्डाच्या बैठकीत उपराज्यपाल गिरीषचंद्र मुर्मू यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. या निर्णयासंदर्भात बुधवारी काही नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या माहिती संचालनालयानेही यासंदर्भात काढलेले पत्रक मागे घेतले आहे. त्यामुळे लोकांमध्ये यात्रेबाबत संभ्रम कायम आहे.


 राजभवनच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबत एक पत्रक काढले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आजची स्थिती पाहून अमरनाथ यात्रा करणे शक्य नाही. येत्या काळात परिस्थितीचा अंदाज घेऊन अमरनाथ यात्रा आयोजनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

Related Stories

कर्जहप्ता स्थगितीचा कालावधी वाढविणे अशक्य

Patil_p

शहरी गरीबांना स्वस्तात घरे

Patil_p

विदेशात शिक्षण घेणाऱयांसाठी महत्त्वाचा निर्देश

Patil_p

चालू शैक्षणिक वर्षांपासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची

datta jadhav

सरकारी आरोग्य केंद्राचे छायाचित्र होतेय व्हायरल

Patil_p

ज्येष्ठ नेते महाबळ मिश्रा काँग्रेसमधून निलंबित

Patil_p
error: Content is protected !!