तरुण भारत

बेंगळूरमध्ये बिहारी कामगारामुळे 9 जणांना संसर्ग

राज्यात गुरुवारी 18 नवे रुग्ण : एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 445 वर : 145 जण संसर्गमुक्त : 18 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

बेंगळूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या शतकापलिकडे गेली आहे. गुरुवारी बेंगळुरात एकाच दिवशी 10 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी 54 वर्षीय बिहारी व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्याच्या संपर्कात आलेल्या 9 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते सर्वजण पुरुष असून 45 वर्षांखालील आहेत. बेंगळूरच्या होंगसंद्र येथे वास्तव्यास असलेल्या बिहारी व्यक्तीच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या 100 हून अधिक जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब आणि रक्त प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहे. या प्रकरणामुळे बेंगळूर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यात गुरुवारी 18 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले. त्यापैकी 10 रुग्ण बेंगळूरमध्ये तर विजापूर, धारवाड आणि मंडय़ा जिल्हय़ात प्रत्येकी 2 तसेच गुलबर्गा आणि मंगळूर जिल्हय़ात प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 445 वर पोहाचली आहे. त्यापैकी 145 जण आतापर्यंत संसर्गमुक्त झाले आहेत तर 18 जण मृत्युमुखी पडले आहेत.

बेंगळूरच्या होंगसंद्र येथे बुधवारी आढळून आलेल्या 54 वर्षीय बिहारी व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या त्याच्या 9 सहकाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निदान झाले. त्यामुळे बेंगळूर महानगरपालिका आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी होंगसंद्र परिसर सीलडाऊन केला आहे. तसेच या भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली आहे. बिहारी व्यक्तीने कोरोनाची लक्षणे दिसताच वेणू हेल्थ केअरमध्ये उपचार घेतले होते. मात्र या इस्पितळाने त्याच्याविषयी माहिती न दिल्याने बुधवारी या इस्पितळाला टाळे ठोकण्यात आले.

लॉकडाऊन जारी होण्यापूर्वी बिहारी व्यक्ती गावावरून बेंगळूरला परतला होता. काही दिवसांत त्याला ताप आणि खोकला झाला. त्यामुळे त्याने सुरुवातीला 4 खासगी क्लिनिकमध्ये तपासणी करून घेतली. तरीही ताप, खोकला कमी झाला नाही. त्यामुळे त्याने वेणू हेल्थ केअरमध्ये तपासणी केली. 20 एप्रिल रोजी तो राजीव गांधी इस्पितळात दाखल झाला. त्याच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर 22 एप्रिल रोजी तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

मंडय़ा जिल्हय़ातील मळवळ्ळी आणि मंडय़ा शहरात प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. मंडय़ा शहरात 47 वर्षीय पुरुष आणि मळवळ्ळीतील 28 वर्षीय युवतीला संसर्ग झाला आहे. गुलबर्ग्यातही 32 वर्षीय युवकाला 67 वर्षीय पित्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. मंगळूर जिल्हय़ातील बंटवाळ येथे 78 वर्षीय वृद्धेला संसर्ग झाला आहे.

हुबळीत दोघांना कोरोनाची बाधा

हुबळी/वार्ताहर

धारवाड जिल्हय़ातील हुबळीत गुरुवारी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह  आढळल्या आहेत. 13 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे मुल्ला गल्लीतील 30 वर्षीय महिलेला आणि केशवापूरच्या आझाद कॉलनीतील 13 वर्षीय मुलीला संसर्ग झाला आहे, अशी माहिती धारवाड जिल्हाधिकारी दीपा चोळण यांनी दिली. या दोघांवर हुबळीच्या किम्स इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Related Stories

पावसाच्या तडाख्याने तंबाखू उत्पादक चिंतेत

Patil_p

बांधकाम नियमावलीची ऐसी की तैसी

Patil_p

बेळगावकरांचा जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरूच

Amit Kulkarni

हंडीभडंगनाथ मठाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू

Amit Kulkarni

बंगाली कारागिरांनी पळविले दोन किलो सोने

Amit Kulkarni

ऊस तोडणी कामगारांवर काळाचा घाला

Rohan_P
error: Content is protected !!