तरुण भारत

नाही तयारी, रंगरंगोटीही नाही… शिरगावात केवळ शांतता !

गावातील लोकांनी घरातच राहण्याचे आवाहन. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार. धोंडगणांची घरातच व्रत पाळण्याची तयारी. धर्मभुषण सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचा जत्रेविषयी महत्त्वाचा संदेश.

रविराज च्यारी/डिचोली

Advertisements

  शिरगाव गावाच्या आणि राज्याच्या इतिहासात प्रथमच देवी लईराईचा प्रसिद्ध जत्रोत्सव रद्द झाल्याने अनेकांच्या श्रध्दा भावना दुखावल्या आहे. जत्रोत्सवाला अवघेच दिवस शिल्लक राहिल्याने शिरगावातील वातावरण पाहण्यासाठी फेरफटका मारला असता या काळात गजबजलेले असणारे शिरगाव अत्यंत शांत दिसून आले. कुठेही जत्रोत्सवाची तयारी नाही तर कुठे रंगरंगोटी नाही. लॉकडाउनमुळे गावात शांतता होतीच पण या लॉकडाउनमुळे पारंपरिक प्रसिद्ध जत्रा रद्द झाल्याने गावातील वातावरणात वेगळीच शांतता दिसून येत आहे.

   शिरगाव गावातील देवी ल ईराईची जत्रा म्हणजे या गावातील व समस्त गोवेकरांसाठी एक मोठा सोहळाच. या सोहळय़ाची तयारी खुद्द शिरगावातच नव्हे तर राज्यभर देवीची श्रध्दा भक्ती जोपासणाऱया धोंडगण भक्तांकडून गावागावत केली जात असल्याने या काळात केवळ शिरगावातच नव्हे तर संपूर्ण गोवा राज्यात या जत्रोत्सवाची तयारी जोमाने होत असल्याचे पहायला मिळत होते. त्या तयारीत असलेला भक्तीपूर्वक उत्साह मोठाच असतो. मात्र यावेळी हा संपूर्ण उत्साह सर्वांच्याच तोंडावरून हरवल्याचे जाणवून आले.

   22 मार्च रोजीचे जनता कर्फ्यु व नंतर राज्य व नंतर केंद्र सरकारने जाहीर केलेले 21 दिवसांचे लॉकडाउन संपूनही केंद्र सरकारने पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाउनचा काळ वाढविल्याने या जत्रोत्सवावर यावेळी संक्रांत येणार अशी शक्मयता होतीच. तरीही देवीच्या धोंडगण व भाविक भक्तांनी हे संकट लवकर टळून देवीची जत्रा निर्विघ्नपणे होऊ दे अशी देवीचरणी मागणीही केली होती. त्या मागणीवरून गोव्यातील करोना व्हायरस बाधीत रूग्णांची संख्या शून्य झाली खरी. मात्र लॉकडाउन काळ 3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने जत्रोत्सवबध्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

देवस्थान समितीतर्फे जत्रोत्सव रद्द करण्यात येणार असल्याची नोटीस जारी.

शिरगावातील देवी लईराईची जत्रा यावषी देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या महामारीमुळे रद्द करण्यात येणार असल्याने त्यादिवशी देवीचे मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे जत्रेच्या दिवशी भाविकांनी व धोंडगणांनी शिरगावात येऊ नये. धोंडगणांनी आपापल्या घरातच सोवळे व्रत पाळताना देवीचे नामस्मरण करावे. असे आवाहन शिरगावातील लईराई देवस्थान समितीने काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या नोटीसीद्वारे भाविकांना कळविले होते. समितीने जारी केलेल्या या नोटीसीमुळे असंख्य भाविक व धोंडगणांच्या मनातील प्रश्नाला उत्तर मिळाले होते. त्यामुळे आज धोंडगणांनी आपापल्या घरातच सोवळे व्रत पाळण्याची तयारी सुरू केली आहे.

देवस्थान समितीतर्फे घराघरात फिरून लोकांना घरीच राहण्याचे आवाहन.

   जत्रेच्या दिवशी देवीचे मंदिर बंद असल्याने तसेच राज्यात सर्वत्र 144 हे जमावबंदीचे कलम लागू असल्याने जत्रेच्या दिवशी म्हणजे 28 एप्रिल रोजी शिरगावातील लोकांंनी घरातच रहावे. कोणीही घराबाहेर पडू नये. मंदिराजवळ गर्दी करू नये. असे आवाहन देवस्थान समितीतर्फे शिरगावातील लोकांना करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव गावकर यांनी दिली. या आवाहनाला सकारात्मक मान देताना शिरगाववासीयांनीही सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे, असेही अध्यक्ष महादेव गावकर यांनी सांगितले.

होमकुंडस्थळी लाकडांचे भोरे अर्पण न करण्याची नोटीस.

   “देवी ल ईराईच्या समस्त धोंड भक्तांना कळविण्यात येत आहे की, भाविकांनी देवीच्या होमकुंडाला कुठल्याही प्रकारचे लाकूड (भोरे) अर्पण करण्यास सक्त मनाई आहे. कृपया सर्वांनी ह्याची नोंद घ्यावी” अशी थेट नोटीसच एका बोर्डद्वारे देवस्थान समितीने होमकुंड स्थळी लावली आहे. दरवषी या जत्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या देवीच्या होमकुंडाला भाविक भक्तांकडून मोठय़ा प्रमाणात लाकडांचे भोरे अर्पण केले जातात. काही भाविकांकडून नवसाची फेड म्हणूनही या होमकुंडाला लाकडाचे भोरे डोक्मयावर घेऊन पाच फेरे मारल्यानंतर होमकुंडस्थळी अर्पण केले जातात. मात्र यावेळी जत्रोत्सव होणार नसल्याने देवस्थान समितीने लोकांना भोरे अर्पण न करण्याची थेट सुचनाच केली आहे.

होमकुंडाचा परिसर, मंदिर परिसर सुना सुना.

  जत्रोत्सवाच्या सात आठ दिवस अगोदरच दरवषी शिरगावात जत्रोत्सवाची लगबग दिसून येत होती. तसेच या जत्रोत्सवात मोठय़ा संख्येने येणाऱया फेरीवाल्यांची दुकाने थाटण्यास प्रारंभ व्हायचा. या दुकानांनी मंदिर परिसराकडून रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली जायची. तसेच होमकुंड परिसरात तर सर्वत्र दुकाने थाटली जायची. यावषी मात्र हा संपूर्ण परिसर सुना सुना आहे. धोंडगणांची तळीही निरव शांत आहे.

(ँर्दे) धर्मभुषण सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींची जत्रेविषयी महत्वाची सुचना. (फोटो वापरावा)

   गोव्यातील देवदेवतांच्या आशिर्वादाने व लोकांच्या पुण्याईने गोवा राज्यातील कोरान बाधीतांची संख्या शुन्य झाली आहे. या देवतांना मानवंदना देतानाच धर्म, धर्मकार्य, गुरू, गुरूपीठे, धर्मपीठे धर्मगुरू हे सर्व देवांशी संबंधीत असल्याने अशा काळात आम्ही आमचे उत्सव बंद न करता नियमांत राहून कसे साजरे करू शकतात यावर विचार व्हावा. धोंडगणांनी आपल्या घरीच राहून व्रत पाळावे व देवीच्या फोटोची पुजा करून व्रताला न्याय द्यावा. शिरगाववासीयांनीही घरातच राहून देवीचे नामस्मरण करावे. व यावषी देवीच आमच्या घरात आलेली आहे, अशी भावना मानत ठेवावी. अशी जत्रा आम्ही सर्वांनी साजरी करावी. हे असे काही आमचे उत्सव सण आहेत ते ब्राह्मण, महाजन अशा पाच दहा लोकांनीच जर साजरे केले तर कोणतीही कायदा मोडला जाणार नाही. आज गोव्यात एकही कोरोना बाधीत रूग्ण नाही, ही देवी लईराईचीच आमच्यावर कृपा असावी. त्यासाठी आम्ही आमच्या जत्रा उत्सव का बंद पाडाव्यात ? हे सर्व आमचे उत्सव साजरे करणे आमचे कर्तव्य असून काही लोकांची भावना आहे की आम्ही मूर्ती पूजक आहेत, पण तसे नसून आम्ही ईश्वरपूजक आहेत. आम्ही पाषाण, मूर्ती, फोटो, झाडात देव पाहतात आणि त्याचे पूजन करतात. प्राणप्रति÷ा केलेल्या मूर्ती, पाषाण, कळसात आम्ही देव पाहतात आणि त्यांना प्रणाम करतात. म्हणूनच या देवतांचे उत्सव साजरे करण्यासाठी आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून कोणताही नियम न मोडता शासनाच्याच सहकार्याने पुढाकखर घ्यायला हवा. आज करोनाचा फैलाव असतानाही जिवनावश्यक वस्तूंसाठी लोकांनी दुकाने सरकारला उघडण्यास भाग पाडले, लोकांनी रांगा लावून जिवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. जेवण हे आपले जिवनावश्यक वस्तू आहेत तर देव हा आपल्या जिवनात जिवनावश्यक नव्हे का ? म्हणूनच शासकीय कायदे नियम राखतानाच सरकारची मान्यता घेऊनच अवघ्याच लोकांच्या सहभागाने ही जत्रा व्हावी केवळ देवीनेच होमकुंड पार करावे. व इतरांनी सामाजिक सुरक्षा अंतर राखताना देवीचे नामस्मरण करावे. या देवदेवतांना आम्ही अलिप्त न ठेवता त्यांचे कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव करावेत. त्यासाठी पोलीस सरंक्षणही घ्यावे. एकेकाळी आमच्या देवदेवनांना नष्ट केले जात होते, आमची मंदिरे फोडली जात असताना आमच्या जाणत्यांनी देवच घेऊन पलायन केले व ज्या ठिकाणी राहिले त्याच ठिकाणी त्यांची स्थापना करून आमच्या देवतांवरील श्रध्दा जिवंत ठेवल्या. आज या महामारीच्या काळात हि पाळी आमच्यावर आलेली असून कायद्याच्या चौकटीत राहून देवी लईराईची जत्रा संपन्न व्हावी अशी आपली तरी इच्छा आहे, अशी सुचना धर्मभुषण सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी युटय़ुबच्या माध्यमातून समस्त गोवेकरांना, शिरगाववासीयांना व सरकारलाही दिला आहे.

Related Stories

कोरोना संशयिताच्या घराचे निर्जंतुकीकरण

Omkar B

माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचे निधन

Amit Kulkarni

अमेरे पोरस्कडेत महामार्ग नदीत कोसळला

Omkar B

फातोर्डा परिसर झाला ‘कार्निव्हल’मय

Amit Kulkarni

राज्यात सनबर्न पार्टी उधळून लावणार

Patil_p

दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!