तरुण भारत

संचारबंदीतही माशेलात तळीरामांचा स्वैर संचार

वार्ताहर / माशेल

 लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू असली व अनेक सार्वजनिक व्यावहारांवर मर्यादा आली तरी त्याचा तळीरामांवर कुठलाच फरक पडलेला नाही. माशेल भागात या  तळीरामांचे मस्त चालले असून दिवसाढवळय़ा खुलेआमपणे दारु ढोसून ते हैदोस घालीत आहेत. नागरिकांना त्यांच्या या स्वैर वागण्याचा त्रास होत असून पोलिसांनी या  गैरप्रकारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 माशेल येथील श्री देवकीकृष्ण सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच वेर्लेकरीण देवस्थानच्या महाद्वाराच्या बाजूला दारुडय़ा तळीरामांनी आपला अड्डा जमविला आहे.   देवस्थान परिसर व भर लोकवस्तीमध्ये कोणताही मुलाहिजा न बाळगता उघडय़ावर  बसून दारु ढोसताना दिसतात. त्यांना अडविणाऱया काही लोकांना शिवीगाळही केली जाते. माशेल पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हे प्रकार सुरु असून पोलीस मात्र अशा लोकांवर कोणतीच कारवाई करीत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. देवकीकृष्ण देवस्थानच्या सभागृहाच्या मुख्य दरवाज्यावर बसून दारु पिणाऱयांवर देवस्थानही कोणतीच हरकत घेत नसल्याने भाविकांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते. देवस्थान समितीकडे तसेच पोलिसांकडे त्यासंबंधी तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही, असे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. देवस्थान सभागृहाच्या बाजूला रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. या बाटल्या कुठून येतात याचीही कुणी चौकशी करीत नाही. या सभागृहाच्यावर अनेक महाजन मंडळी वास्तव्यास आहेत. लॉकडाऊन व दारु विकण्यास सक्त बंदी असताना दारू कुठून मिळते? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सध्या काजू हंगामात दारुच्या भट्टय़ा लावल्या जातात. माशेल परिसरात मोठय़ा प्रमाणात अशा भट्टय़ा याठिकाणी सेशल डिस्टसिंग न पाळता लोकांना दारू विकली जाते. यासंबंधी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. संबंधित सरकारी यंत्रणांकडून केवळ कारवाईचे नाटक केले जाते, असेही काही लोकांचे म्हणणे आहे.

दारुबरोबरच सध्या तंबाखू व गुटखा विक्रीवर सक्त बंदी आहे. तरीही माशेल बाजारपेठेत गुटख्याची पाकिटे मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर पडलेली दिसतात.  काही व्यापारी येथे गुटखा विकत असल्याच्या तक्रारी आहेत.

Related Stories

दामदुपटीने दुकानात वस्तूंची विक्री!

tarunbharat

शिकारीसाठी गावठी देशी बंदुका बनविणारी टोळी गजाआड

Omkar B

शिक्षकांनी आजपासून शाळेत हजेरी लावावी

Omkar B

बाराजण येथील दुचाकीस्वारावर गव्याचा हल्ला

Amit Kulkarni

साळावली धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी हालचाली

Omkar B

मडगावातून दोन मुलींचे अपहरण फातोर्डा येथील संशयिताच्या मागावर पोलीस

Amit Kulkarni
error: Content is protected !!