तरुण भारत

पणजीत आजपासून मोबाईल, इलेक्ट्रीकल, स्टेशनरी दुकाने खुली

प्रतिनिधी / पणजी

आजपासून विद्युत उपकरणे व सामानाची विक्री करणारी दुकाने पणजी मनपा परिसरात खुली करण्यास परवानगी दिली जाईल. याशिवाय भ्रमणध्वनी विक्री व दुरूस्ती दुकाने तसेच पुस्तके, वहय़ा, पेन इत्यादी स्टेशनरी दुकाने देखील खोलण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. महापौर उदय मडकईकर यांनी वरील माहिती दिली.

Advertisements

 महापौर म्हणाले की अन्य सर्व दुकाने सुरू होण्यासाठी 3 मेपर्यंत वाट पहावी लागेल. लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत आहे. तत्पूर्वी सोमवारी केंद्र सरकार कोणता निर्णय घेते हे पहावे लागेल.

 दुकानदारांनी आज अर्ज करावेत

 केंद्र व राज्य सरकार जोपर्यंत लॉकडाऊन उठवित नाही तोपर्यंत आम्ही पणजीचे मार्केट खुले करायला देणार नाही. मात्र आजपासून स्टेशनरी, विद्युत सामान ज्यामध्ये पंखे, एअरकंडिशन, लाईटस् इत्यादींचा समावेश आहे अशी दुकाने खोलण्यास परवानगी देऊ. ज्यांना दुकाने खुली करायची आहेत त्यांनी त्यासाठी आजच अर्ज करावेत, आम्ही त्वरित अशी दुकाने खुली करण्यास परवानगी देऊ असे त्यांनी सांगितले.

 याशिवाय मुलांना पुस्तके मिळावीत, आवश्यक स्टेशनरी तसेच वहय़ा पेन, पेन्सीली इत्यादी वस्तू मिळाव्यात या करीता सर्व स्टेशनरी दुकाने खुली करण्यास आज परवानगी दिली जाईल. भ्रमणध्वनी विक्री आणि भ्रमणध्वनी दुरूस्ती करणाऱयांची दुकानेही आजपासून सुरू होतील. या सर्वांनी अर्ज सादर करावेत म्हणजे दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे महापौरांनी पुढे सांगितले.

 अद्याप प्रश्न आहे तो नळ दुरूस्तीचे सामान विकणाऱयांची, हार्डवेअर दुकाने सुरू करण्याबाबत सरकारने परवानगी दिलेली नाही. तथापि ज्यांना सामान हवे असेल त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा असे आपण हार्डवेअर दुकानदारांना सांगितले आहे. पणजी मार्केटचा प्रश्न हा 3 मे रोजीच निकालात काढला जाईल. पणजीतील हॉटेल्स व तयार कपडय़ांची दुकाने अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यावरही 3 मे रोजी राज्य सरकार निर्णय घेईल. गोव्यात आणखी कोविड-19 च्या बाधित रुग्ण सापडला नाही तर गोव्यात लॉकडाऊनची गरज पडणार नाही असेही महापौर उदय मडकईकर म्हणाले.

Related Stories

आगोंद येथील विवेकानंद ना. गावकर यांचे निधन

Omkar B

चार पालिकांसाठी पहिल्या दिवशी दहा अर्ज

Amit Kulkarni

केंद्राच्या पॅकेजमधून गोव्याला किती मिळणार?

Omkar B

भारतीय नौदल ऍअर स्कॉड्रन 323 नौदलाच्या सेवेत दाखल

Amit Kulkarni

वाळपई,होंडा भागात पोलीस खात्याच्या वाहनाकडून मोठय़ा प्रमाणावर

Omkar B

अग्निशामक दलाच्या तीन कर्मचाऱयांना मुख्यमंत्रीपदक

Patil_p
error: Content is protected !!