तरुण भारत

कोरोना योद्धय़ांवरील हल्लेखोर संसर्गबाधित आढळल्याने खळबळ

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरमधील पादरायनपूर येथील कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या कोरोना योद्धय़ांवर जमावाने हल्ला केला होता. या घटनेप्रकरणी 100 हून अधिक जणांना अटक करून रामनगर जिल्हा कारागृहात हलविण्यात आले होते. त्यांची स्क्रिनिंग तपासणी केली असता पाच जणांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. खळबळ उडाली आहे.

Advertisements

पादरायनपूर येथे 11 पेक्षा अधिक जण कोरोनाबाधित असल्यामुळे हा वॉर्ड सीलडाऊन करण्यात आला होता. येथील संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी रविवारी रात्री 10.45 च्या सुमारास गेलेल्या आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व पोलिसांवर 200 पेक्षा अधिक जणांनी हल्ला केला होता. या प्रकरणी 100 हून अधिक जणांना अटक करून ग्रीन झोन असलेल्या रामनगर जिल्हा कारागृहात हलविण्यात आले होते. त्यांना पुन्हा बेंगळुरात आणण्यात आले आहे. दरम्यान, पादरायनपूरच्या 5 हल्लेखोरांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.  

Related Stories

विमा क्षेत्रात एफडीआयची मर्यादा वाढणार

Amit Kulkarni

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले – प्रकृती स्थिर

Rohan_P

उत्तराखंडात मागील 24 तासात 109 मृत्यू; 7,749 नवे कोरोनाबाधित

Rohan_P

तोयबा कमांडरसह दोघांना कंठस्नान

Patil_p

दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

datta jadhav

गर्भवतींना कोरोना लस दिली जाऊ शकते -आयसीएमआर

triratna
error: Content is protected !!