तरुण भारत

इंग्लिश क्रिकेट हंगाम जुलैपर्यंत स्थगित

वृत्तसंस्था/ लंडन

कोरोना महामारीचा प्रसार ब्रिटनमध्ये झपाटय़ाने होत असून सर्व खबरदारीचे उपाय अंमलात आणले जात आहेत. इंग्लंडला कोरोनाचा फटका मोठय़ा प्रमाणात बसला असून शेकडो लोकांचे बळी गेले असून हजारो लोकांना याची बाधा झाली आहे. ब्रिटनच्या आर्थिक स्थितीवरही विपरित परिणाम झाला आहे. ब्रिटनमधील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची कोणतीही व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा 1 जुलैपूर्वी सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

इंग्लंडमध्ये इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेची मे अखेरीस सुरुवात होते. पण कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. जुलैपर्यंतच्या सर्व क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या असून सप्टेंबरअखेरनंतर इंग्लंडमध्ये पुन्हा क्रिकेट हंगामाला कदाचित प्रारंभ होईल, अशी अपेक्षा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. विंडीजचा क्रिकेट संघ सप्टेंबरअखेरीस इंग्लंडच्या दौऱयावर येणार आहे. त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट मालिका याच कालावधीत खेळविली जाईल. यामध्ये वन डे आणि टी-20 चे सामने खेळविले जातील. पण या सामन्यांची ठिकाणे बदलावी लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेच्या हंगामातील नऊ फेऱयातील सामने रद्द करावे लागले आहेत. येत्या जूनमध्ये होणारे क्रिकेटचे सर्व सामने बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आले आहेत.

Related Stories

अमेरिकेची ऍथिंग मू 800 मीटर्समध्ये विजेती

Patil_p

कोरोनामुळे पॅरीस मॅरेथॉन रद्द

Patil_p

भारतात कसोटी मालिका जिंकणे आवडेल

Patil_p

सौरभ गांगुलींना इस्पितळातून डिस्चार्ज

Patil_p

चमारीच्या पॉवरहिटिंगचे रहस्य!

Patil_p

पाकची झिम्बाब्वेवर 6 गडय़ांनी मात

Patil_p
error: Content is protected !!