तरुण भारत

रविवारपेठेत शुक्रवारी खरेदीसाठी तोबा गर्दी

किरकोळ खरेदीसाठीही गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

प्रशासनाने रविवारपेठ सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत घाऊक व्यापाऱयांसाठी खुली ठेवण्यास परवानगी दिल्याने शुक्रवारी खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी उसळली. नागरिक वाहने व हातात पिशव्या घेऊन बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले दिसून आले. दिवसभर शांत असलेल्या बाजारपेठेत सायंकाळी वर्दळ वाढली होती.

शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारपेठमध्ये मोठय़ा प्रमाणात किराणा मालाची खरेदी होत असते. नागरिकांनी किरकोळ किराणा माल आपापल्या परिसरातील दुकानातून खरेदी करावा, असे आवाहन करूनदेखील किरकोळ खरेदीसाठीही गर्दी झाली होती.

यावेळी आजूबाजूच्या परिसरातील किराणा दुकानदारांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. रात्री दहानंतर घाऊक व्यापाऱयांना मालाची चढउतार करण्यासाठी परवानगी दिली आहे. यावेळेत किरकोळ खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. खरेदीसाठी काहीवेळच देण्यात आल्याने दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली होती.

काही दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले असले तरी काही ठिकाणी त्याचा फज्जा उडालेला दिसून आला. त्याबरोबरच वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घाऊक खरेदीसाठी बाजारपेठ सुरू ठेवण्यात आली असली तरी किरकोळ खरेदी करणाऱया ग्राहकांचीही यावेळी गर्दी झालेली पहावयास मिळाली. याबरोबरच मालाची ने-आण करण्यासाठी हमालांची वर्दळही होती.

अन्यथा बाजारपेठ पूर्णपणे बंद… रविवारपेठेतील नव्या व्यवस्थेसंदर्भात शुक्रवारी लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकाऱयांची बैठक पार पडली. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी घाऊक आणि किरकोळ दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी करू नये. जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच घाऊक दुकानदारांनी किरकोळ दुकानदारांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांची ऑर्डर घ्यावी. तसेच किराणा माल दुकानपोच द्यावा, अशी सूचना केली. यावेळी दुकानदारांनी आम्हाला मालवाहतुकीचा पास देण्याची मागणी केली. यावेळी कायद्याचे उल्लंघन झाल्यास पुढील काळात बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याची नामुष्की ओढवेल, असाही इशारा दिला. सध्याच्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

Related Stories

हस्तशिल्पी संस्थेतर्फे उद्यापासून सिल्क इंडिया प्रदर्शन

Amit Kulkarni

अखेर बिळगी येथील मांत्रिकाला अटक

Rohan_P

पोलीस महानिरीक्षकांनी घेतली व्यापाऱयांची बैठक

Rohan_P

आधार नोंदणीसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी

Patil_p

यल्लम्मा देवस्थानतर्फे पुजाऱयांना किट

Amit Kulkarni

अनगोळ मुख्य रस्त्यावर अडकले अवजड वाहन

Amit Kulkarni
error: Content is protected !!