तरुण भारत

पिरनवाडीतील 86 जणांचे स्वॅब पाठविले तपासणीसाठी

वार्ताहर/ किणये

पिरनवाडी येथील 86 जणांचे स्वॅब जमा करून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र किणये व पिरनवाडी ग्रा. पं. यांच्यावतीने शुक्रवारी ही मोहीम राबविण्यात आली.

Advertisements

ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील गावांमध्ये काही स्थानिक बाहेर गावाहून आले होते. पुणे, बेंगळूर, दिल्ली, मुंबई आदी ठिकाणाहून आलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी शिक्षिका यांनी सर्व्हे केल्यानंतर यांची माहिती ग्राम पंचायतीला कळविण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रा. पं. यांच्या पुढाकाराने त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पिरनवाडी गावात एका 33 वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. सदर तरुण हा दिल्ली येथील मरकजला जाऊन आला होता. यापूर्वी त्याच्या सहवासात आलेले शेजारच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईक आदी 35 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती ग्रा. पं. अध्यक्ष राकेश तळवार यांनी दिली.

सध्या पिरनवाडी येथे कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून पिरनवाडीसह मच्छे, हुंचेनहट्टी या ठिकाणचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी तालुका आरोग्यधिकारी डॉ. धुमगोळ, किणये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ. प्रशांत धोंगडी, अशोक कोरे, पी. जी. पुजारी, ग्रा. पं. अध्यक्ष राकेश तळवार, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये योग अभ्यासक्रम सुरू

Amit Kulkarni

प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक सेवा पुरवा

Omkar B

उचगाव येथील भाजलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

sachin_m

विद्यार्थिनींशी असभ्य बोलणाऱया शिक्षकास चोप

Patil_p

रामचंद्र मन्नोळकरांच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ

Omkar B

नवीन बीपीएल रेशनकार्डचे काम ठप्पच

Omkar B
error: Content is protected !!