तरुण भारत

शहरात २ वेश्या अड्डयांवर छापा, ३ अटक

कोल्हापूर / प्रतिनिधी

शहरातील मंडलिक वसाहत येथे वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षकांना मिळाली. त्यांच्या पथकाने छापा टाकून मंडलिक वसाहत येथील अर्चना शिवाजी यादव (वय- ३४, मुळ रा. सांगरूळ, ता. करवीर) हिला अटक केली. तिच्याकडून रोख ६ हजार ७००, मोबाईल जप्त केला. तसेच शाहूपुरी पोलिसांनीही छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका करून व्यवस्थापकासह एजंट महिलेवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून सुमारे चार हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सागर प्रभाकर कांबळे (वय 30, मिणचे खुर्द, भुदरगड) आणि एजंट अनुजा यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, न्यू शाहूपुरीमध्ये असलेल्या एका लॉजमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत एका पिडीत महिलेची सुटका केली. या लॉजचा व्यवस्थापक सागर कांबळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासह वेश्या व्यवसायाला मदत करणाऱ्या एजंट महिलेवर गुन्हा दाखल केला 

 दरम्यान, रात्री मंगळवार पेठेतील मंडलिक वसाहत परिसरामध्ये वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती करवीरचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकासह अड्डयावर छापा टाकून दोन पिडीत महिलांची सुटका केली. मंडलिक वसाहत येथे रत्नाबाई पुजारी यांच्या घरात भाडयाने राहणाऱ्या अर्चना शिवाजी यादव (वय- ३४, सद्या रा. मंडलिक वसाहत, मुळ रा. सांगरूळ, ता. करवीर) या वेश्या अड्डा चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. तिच्याकडून रोख ६ हजार ७००, मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आला. तर २ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार अंजना फाळके करीत आहेत.

Related Stories

निमसोडच्या द्राक्षाची विदेशात गोडी.

Patil_p

कोल्हापूर : बदली पोलिसांना सोडा, अन्यथा पगार तहकूब

triratna

कोल्हापूर : राजेंद्रनगर साळोखे पार्क येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट

triratna

दिवाळीची लगबग सुरु; काळजी घेण्याची गरज

Patil_p

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात समन्वयाचा अभाव

triratna

क्षारपड जमीनमुक्तीचा पॅटर्न राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्न करु – राज्यकृषी सचिव डवले

triratna
error: Content is protected !!