तरुण भारत

कोरोनामुळे राजापूर नगर परिषदेच्या 15 कोटींच्या कामांना खीळ

नव्या कोदवली धरणासह मुख्य रस्त्याचे कामही रखडले

वार्ताहर/ राजापूर

Advertisements

गतवर्षी विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता आणि यंदा कोरोनाच्या जागतिक संकटाचा फटका राजापूर नगर परिषदेच्या विकासकामांना बसला आहे. जकातनाका ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासह कोदवली येथील सायबाच्या धरणाचे बांधकाम अशा विविध तब्बल 15 कोटींच्या विकासकामांना यंदा कोरोनामुळे खीळ बसली आहे. याचा फटका नागरिकांना पुढील वर्षापर्यंत सहन करावा लागणार आहे.

या बाबत बोलताना नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी सांगितले की, सप्टेंबरपासून नियोजन करून आपण तब्बल 15 कोटी रूपयांची विकासकामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होतो. सभागृहानेही त्यासाठी साथ दिली होती मात्र कोरोना संकटाने तूर्त तरी या विकासकामांना यंदाच्या वर्षी खीळ बसणार आहे. जिल्हा नगरोत्थानमधील शहरातील 17ही प्रभागांतील 7 कोटी 7 लाखांची मे अखेरपर्यंत होणारी विविध कामे रखडली गेली आहेत. तर वैशिष्टय़पूर्ण योजनेतील राजीव गांधी स्टेडियममध्ये वॉकींग ट्रक बांधणे, भाजी व फळमार्केटचे नूतनीकरण करणे, कोर्ट ते निनादेवी मंदिरापर्यंत पाईपलाईन टाकणे, कोदवली येथील सायबाचे नूतन धरण बांधणे अशा कोटी 3 लाखांची कामे ठप्प झाली आहेत.

आमदार हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर नगर परिषदेला 50 लाख 50 हजार रूपयांचा स्वनिधी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिला होता. यामध्ये तब्बल 11 विकासकामे हाती घेण्यात आली होती. यात गणेश विसर्जन घाटाचे सुशाभिकरण, एमएसईबी गोडाऊन ते नदीपात्रापर्यंत सुशोभिकरण, गणेश नार्वेकर घरासमोरील पुलालगत सुशोभिकरण, कोंढेतड चव्हाटा ते बौध्दवाडीपर्यंत रस्ता क्रॉक्रिटीकरण, प्रभाग क्र.5 शौचालय बांधणे अशी कामे प्रस्तावित होती. ही कामेदेखील आता अडकून पडली आहेत.

नाविन्यपूर्ण योजनेतून राजीव गांधी क्रीडांगण येथे 93.46 लाख रूपये निधीत ऍक्टीव्हिटी सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे कामदेखील आता ठप्प झाले आहे. दलितेतर योजनेतून धुतपापेश्वर मंदिर ते निशाणघाटी रस्ता क्राँक्रीटीकरणाचे 9 लाखांचे कामही बंद पडले आहे. याशिवाय विशेष रस्ता अनुदानातून व रस्ता अनुदातानून होणारे 1 कोटी 15 लाख रूपयांचे तालीमखाना नाका ते जवाहर चौक रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण, आयडीएमएसटी योजनेतून 45 लाखांची होणारी नाटय़गृहाची दुरूस्ती आणि चौदाव्या वित्त आयोगातून 75 लाख रूपयांत न. प. हद्दीतील विविध ठिकाणी स्ट्रीटलाईट पोल व हायमास्ट उभे करण्याच्या कामालाही खीळ बसली आहे.

Related Stories

पत्रकार कक्षास आमदार वैभव नाईक यांच्या वतीने संगणक संच भेट

Ganeshprasad Gogate

वटपौर्णिमेमुळे कुडाळ बाजारपेठेत गर्दी

NIKHIL_N

गुहागरचा प्रवास काखेत कळसा नि गावाला वळसा!

Patil_p

ऑनडय़ुटी ट्रफिक पोलिसाचे हार्टऍटॅकने निधन

NIKHIL_N

पूर्ण क्षमतेने एस.टी.सेवा सुरू

Patil_p

भाजपची आगामी निवडणुकांची तयारी

Patil_p
error: Content is protected !!