तरुण भारत

विद्युत तारेच्या धक्याने बापलेकांचा मृत्यू

प्रतिनिधी / वारणानगर

मसुदमाले ता. पन्हाळा येथील मळा नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेलेवर शेतात उभा असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढलेल्या तारेला स्पर्श होऊन लागलेल्या शॉकने बाबासो पांडुरंग पाटील वय ४८ रा. महादेवनगर माले यांचा व त्यांना वाचवावयास गेलेला मुलगा कु. राजवर्धन वय १६ याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ८ .३० वा. ही घटना घडली या घटनेने मालेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

माले येथील मळा नावाच्या शेतातून ११ किं.वॅटची विद्युत वाहिनी गेली आहे या शेतात असलेल्या विद्युत खांबाचा ताण काढण्यासाठी स्वतंत्र दुसऱ्या तारेचा वापर करून ती शेतात रोवली आहे याच तारेला बाबासाहेब यांचा स्पर्श झाला त्यात त्याचे दोन्ही पाय गुडग्या पर्यन्त पूर्णता जळाले होते त्यातच ते गतप्राण झाले त्याना याक्षणी वाचवाव्यास गेलेला मुलगा कु. राजवर्धन याचेही विजेच्या धक्याने निधन झाले. आज अक्षयतृतियाच्या सन सकाळीच बापलेकांचा झालेला मृत्यू ह्रदय पिळवटणारा ठरला बाबासाहेब पाटील हे मुळचे उत्रे ता. पन्हाळा येथील परंतु माले गांवचे जावई लग्नानतंर ते कायमस्वरूपी रहायला माले येथे आले होते.

Related Stories

मोदी नसते तर भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगना राणावत

Abhijeet Shinde

शिवतीर्थवरील मेघडंबरीच्या कामास सुरुवात

Patil_p

कोयना धरणात पाणी मावेना!

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ हजार शिष्यवृत्तीधारकांना दिलासा

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

हे राज्य ठोकशाहीचे

Patil_p
error: Content is protected !!