तरुण भारत

आजर्‍यातील मोरेवाडी धनगरवाड्यात आठवड्यात 4 म्हैशींचा मृत्यू

वार्ताहर/किणे

आजरा तालुक्यातील वाटंगीपैकी मोरेवाडी धनगरवाडा येथे गेल्या आठ दिवसात 4 म्हैशींचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही वाड्यावस्तीमध्ये एकूण 30 जनावरे बाधीत असून जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग व गोकूळ संघाचे पशू वैद्यकीय विभागाच्या दोन्ही टिमने बाधीत जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. तर सध्या 150 जनावरांना घटसर्फ प्रतिबंधक लसीकरण केले आहे. मृत म्हैशींचे पंचनामे केले असून नमुना तपासणीसाठी लिव्हर चे व रक्ताचे नमुने पूणे येथे पाठविण्यात आले आहेत.

Advertisements

मोरेवाडी येथील मसणाबाई गावडे, विलास पोवार, भिमराव वांद्रे, तर धनगरवाड्यावरील धावू आडूळकर यांच्या म्हैशी दगावल्या. सध्या लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या दुभत्या जनावरांच्या मृत्यू मुळे मोठे संकट कोसळलं असून गोकूळ संघाने या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

कोल्हापूर महापालिकेचे घरफाळा, टीपी अधिकारी धारेवर

Abhijeet Shinde

माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी उद्या कोल्हापुरात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीतील खूनी हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

Abhijeet Shinde

खुल्या, ओबीसींवर अन्याय करणारा निर्णय मागे घ्या

Abhijeet Shinde

चुये येथे युवतीची आत्महत्या

Abhijeet Shinde

डॉ. संदीप काटे करणार नॉन स्टॉप अंजिक्याताऱयांची चढाईउतराईची मोहिम

Patil_p
error: Content is protected !!