तरुण भारत

24 तासात केवळ 3 नवे रुग्ण

बेंगळूरमध्ये गर्भवतीचा मृत्यू

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात वेगाने कोरोनाचा फैलाव होत असतानाच रविवारी कर्नाटकाच्या दृष्टीने दिलासादायक चित्र होते. रविवारी राज्यात केवळ 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गुलबर्ग्यात 2 तर मंगळूरमध्ये एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बेंगळूरमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 19 झाली आहे. तर एकूण रुग्ण संख्या 503 वर पोहोचली आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यात 55 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे आरोग्य खात्यातील कर्मचाऱयांची चिंता वाढली होती. मात्र रविवारी सकाळी एक आणि सायंकाळी 2 असे एकूण 3 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता काही प्रमाणात कमी झाली. दुसरीकडे बेंगळूर शहर जिल्हय़ातील 45 वर्षीय गर्भवती महिलेचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 24 एप्रिल रोजी तिला व्हिक्टोरिया इस्पितळात दाखल करण्यात आले होते. 25 रोजी अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, मात्र रविवारी तिचा मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीनिवास यांनी दिली आहे.

या महिलेला रक्तस्त्राव आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वी मुडलपाल्य येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर व्हिक्टोरिया इस्पितळात हलविण्यात आले होते. त्यामुळे बेंगळूरमधील मृतांची संख्या 5 वर पोहोचली आहे. बेंगळूरमध्ये विलगीकृतांची संख्याही वाढत असून सीलडाऊन असलेल्या वॉर्डाची संख्या 38 झाली आहे.

गुलबर्ग्यातील रुग्णसंख्या 38 वर

गुलबर्ग्यात रविवारी आणखी दोन नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील रुग्णसंख्या 38 झाली आहे. रविवारी 7 वर्षीय बालकाला आणि 65 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्येत गुलबर्गा जिल्हा पाचव्या स्थानावर आहे. जिल्हय़ात आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 7 जण संसर्गमुक्त झाले आहेत.        

एकाच दिवशी 24 जण संसर्गमुक्त

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच राज्यात आतापर्यंत 182 जण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. रविवारी एकाच दिवशी 24 रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. बेंगळूरमध्ये 8, म्हैसूर, बागलकोट, मंडय़ा, जिल्हय़ात प्रत्येकी 4 आणि बेळगाव व बळ्ळारी जिल्हय़ातील प्रत्येकी 2 संसर्गमुक्त झाले आहेत.

Related Stories

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार संरक्षण

Patil_p

149 नागरिक लंडनहून जयपूर शहरात दाखल

Patil_p

एमएसएमईंना हवे ‘प्रोत्साहन’ – रविंद्र सावंत, लघुउद्योजक

Amit Kulkarni

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबागेतील आंदोलनाला पोलिसांकडून ब्रेक

tarunbharat

अर्थसंकल्पावर गांधीहत्येचे दृश्य

Patil_p

तबलिगी जमातीच्या 2550 परदेशींना 10 वर्षांसाठी भारतात बंदी

datta jadhav
error: Content is protected !!