तरुण भारत

प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 27 सप्टेंबरपासून

वृत्तसंस्था/ पॅरीस

कोरोना व्हायरस महामारीमुळे 24 मे ते 7 जून दरम्यान होणारी पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी यापूर्वी घेतला आहे पण इतर टेनिस फेडरेशनबरोबर कोणतीही चर्चा न करताना सदर स्पर्धा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा आयोजकांवर टीका केली जात आहे. आता ही स्पर्धा आणखी एका आठवडय़ाच्या कालावधीसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता असून सदर स्पर्धा 27 सप्टेंबरला सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.

Advertisements

पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा एक आठवडय़ाच्या कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याने या स्पर्धेकरिता पात्र फेरीचे सामने पूर्ण होण्यास एक आठवडय़ाचा कालावधी लागेल, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. प्रेंच टेनिस फेडरेशनने या स्पर्धे संदर्भात आयटीएफ, एएफपी आजणि डबल्यूटीए यांच्याशी संपर्क साधला होता, असे सांगण्यात आले. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 13 सप्टेंबरला संपणार आहे तर 29 जून ते 12 जुलै दरम्यान खेळविली जाणारी विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

Related Stories

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर रैना म्हणाला…

prashant_c

नदाल, वावरिंका यांचा धक्कादायक पराभव

Patil_p

चौथ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरला

Patil_p

झारखंडमधील ऍथलिटवर भाजी विकण्याची वेळ

Patil_p

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!